ब्रायडल केअर

स्वप्ना साने
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

दिवाळी सरली आणि आता लग्नाचा सीझन सुरू झाला. साखरपुडा, लग्न, प्री-वेडिंग फंक्शन, फोटो शूट, संगीत, मेंदी आणि काय बाकी हौस असेल ते सगळे कार्यक्रम प्लॅन करायचा सीझन आला आहे. हल्ली नवऱ्या मुलीबरोबर नवरा मुलगाही ब्यूटी रूटीन प्लॅन करतो. म्हणून आपण बघू या नवरी आणि नवरदेवाचे ब्यूटी रूटीन काय असावे. 

लग्न ठरल्यानंतर खालील गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यावे -
 लग्न ठरल्यावर किती वेळ आहे, त्यानुसार आपल्या ब्यूटी थेरपिस्टकडून प्री ब्रायडल ट्रीटमेंट सुरू करावी. यात स्किनला सूट होणारे फेशियल करावे. 

 • त्वचेवर काही डाग अथवा पिंपल्स असतील, तर त्वरित त्याची ट्रीटमेंट सुरू करावी. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 • स्किन भरपूर टॅन झाली असेल तर अँटी टॅनिंग पॅक लावावा. 
 • बॉडी पॉलिशिंगच्या सेटिंग घ्याव्यात. असे केल्यास संपूर्ण शरीराचे क्लिन्सिंग, टोनिंग आणि मसाज होतो, बॉडी डीटॉक्स होते.
 • डाएट प्लॅन करणे हेदेखील महत्त्वाचे. जमल्यास डाएटिशीयनकडून प्लॅन करून घ्यावा. बॉडी डीटॉक्स करण्यापासून गरज असल्यास वजन कमी करण्यापर्यंत तुम्ही प्लॅनिंग करू शकता; अर्थात किती महिन्यांचा कालावधी आहे, त्यानुसार प्लॅन करावा लागेल.
 • डाएटबरोबरच योगा आणि इतर व्यायाम फार गरजेचा आहे. असे केल्याने शरीर आणि मन दोन्हीचे आरोग्य फिट राहील, ताण कमी होईल आणि त्यामुळे त्वचेवरही ग्लो येईल.  
 • बॉडी हायड्रेटेड ठेवावी. त्यासाठी भरपूर पाणी पिणे, आणि आहारात फळे, सॅलडचा समावेश करणे आवश्यक आहे. 
 • फक्त त्वचाच नाही, तर केसांचीही काळजी घ्यावी. हेअर फॉल असेल तर त्यावर त्वरित ट्रीटमेंट सुरू करावी. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
 • त्वचेला तजेलदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी वेळ मिळेल तसे घरगुती उपाय करावेत. ब्यूटी किटपण तयार करावी, ज्यात तुमच्या बेसिक गरजेचे सामान असेल. 
 • वरील सर्व टिप्स दोघांसाठी आहेत. नवरा मुलगा आणि मुलगी दोघांनीही योग्य प्लॅनिंग करून या गोष्टी फॉलो कराव्यात. 

क्विक टिप्स

 • रोज क्लिन्सिंग, टोनिंग, आणि मॉइस्चरायझिंग करावे. रात्री नरिशिंग क्रीम लावावे. 
 • आठवड्यातून एकदा बेसन, चिमूटभर हळद आणि दही मिक्स करून संपूर्ण बॉडी स्क्रब करावी. नंतर धुऊन त्वचेला बॉडी लोशन लावावे. 
 • हातांची आणि नखांची काळजी घ्यावी. हात ड्राय असतील तर रात्री पेट्रोलियम जेली मसाज करून लावावी. लगेच फरक जाणवेल. नखांना रेग्युलर ट्रिम करावे आणि शेप द्यावा. 
 • ओठ सारखे फुटत असतील तर 
 • रात्री झोपताना साजूक तूप लावावे. साखर आणि खोबरेल तेल मिक्स करून ओठांना स्क्रब करावे. लगेच ओठ सॉफ्ट होतील. 
 • स्ट्रेस कमी करण्यासाठी जमेल तसा कामातून पाच मिनिटे ब्रेक घ्यावा आणि डोळ्यावर काकडीचे काप ठेवावेत. ते शक्य नसल्यास रोझ वॉटरच्या पट्ट्या ठेवाव्यात, रिलॅक्स वाटेल.

संबंधित बातम्या