बुकशेल्फ

रोहित हरीप
शुक्रवार, 18 मे 2018

बुकशेल्फ
 

विश्‍वासमत भाग १
लेखक : विश्‍वास पाठक
प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे 
पाने : २९०

विश्‍वासमत भाग २
लेखक : विश्‍वास पाठक
प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे
पाने : २६६

किंमत : दोन्ही खंडांची मिळून ७५० रुपये.

एव्हिएशन सेक्‍टर ते मीडिया अशा वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवस्थापकीय पातळीवर प्रदीर्घ काळ काम करण्याचा अनुभव असलेले विश्‍वास पाठक हे कॉर्पोरेट क्षेत्रातले एक मोठे नाव आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असतानाच समाजकारण, राजकारण, अर्थकारण अशा क्षेत्रांशी त्यांचा जवळून संबंध आला. या घटकांचे विश्‍लेषण करणाऱ्या लेखांचे संकलन ‘विश्‍वासमत’ या पुस्तकात करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागात नरेंद्र मोदींचा ऐतिहासिक विजय, भारतीय राजकारणावर झालेला परिणाम, प्रशासकीय बदल या विषयांवर भाष्य करणाऱ्या लेखांचा संग्रह करण्यात आला आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात शहरी व ग्रामीण भागातील प्रश्‍न, राजकीय पक्षांची मनोवस्था या विषयांवरचे लेख आहेत. विद्यार्थ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांसाठी हे पुस्तक वाचनीय ठरेल.

इतिहासातील प्राणिविश्‍व, भाग १
लेखक : महेश तेंडुलकर
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन, पुणे
किंमत : ३६० रुपये.
पाने : ३४३

इतिहासातील प्राणिविश्‍व, भाग २
लेखक : महेश तेंडुलकर
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन, पुणे
किंमत : ३६० रुपये.
पाने : ३३२

इतिहास आणि पशुपक्षी यांचा संबंध प्राचीन आहे. हत्ती ,घोडे, उंट, बैल, शिकारी कुत्रे यांनी पूर्वीच्या काळातील मोहिमांत, लढायात फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराणा प्रताप यांचा चेतक घोडा असो किंवा शिवाजी महाराजांची कृष्णा घोडी यांच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. या प्राण्यांच्या इतिहासातील अमूल्य योगदानाबद्दल अबुल फजलसारख्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. या प्राण्याच्या इतिसाहासातील नोंदी, किस्से, त्यांची व्यवस्था या सर्व घटकांची माहिती देणारे हे पुस्तक मनोरंजक तर आहेच पण इतिहास अभ्यासकांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. इतिहास आणि प्राणी यांचे नाते उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे महेश तेंडुलकर यांनी केला आहे.
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या