बुकशेल्फ
बुकशेल्फ
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
बीजिंगचे गुपित
लेखक : जेन वाँग
अनुवाद : मोहन गोखले
किंमत : ३५० रुपये
पाने : ३२२
चीनच्या साम्यवादी राजवटीला कंटाळून यीन लुयी ही तरुणी चीन सोडून जायचा विचार करते आणि सरकारी कारवाईत अडकते. पलायनाचा प्रयत्न करत असताना यीन चीनमध्ये शिकायला आलेल्या जेनला मदत मागते पण हा प्रयत्न फसतो. या प्रसंगाची टोचणी जेनला लागून राहते.
यीन लुयीचे नक्की काय होते याचा शोध घेण्यासाठी पत्रकार झालेली जेन वाँग चीनमध्ये काही दशकानंतर परत येते. मधल्या काळात चीनमध्ये यीन लुयीवर काय वेळ येते? या तरुणीला कोणत्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते? याची कहाणी म्हणजे ‘बीजिंगचे गुपित’...
अमेरिकी राष्ट्रपती
लेखक : अतुल कहाते
किंमत : ४९५ रुपये.
पाने : ४९०
अमेरिका हा जगातला सर्वांत शक्तिशाली देश ! या देशाचा सर्वांत शक्तिशाली नागरिक म्हणजे या देशाचा अध्यक्ष ! अमेरिकेच्या अध्यक्षांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम हा सर्व जगावर होत असतो. याकारणे अमेरिकेचा अध्यक्षांच्या प्रत्येक बारीकसारीक कृतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून असते. जॉर्ज वॉशिंग्टनपासून ते बराक ओबामपर्यंतच्या सर्व अमेरिकी अध्यक्षांची कारकीर्द, त्यांचे खासगी आयुष्य, आयुष्यातले चढउतार याचा वेध ‘अमेरिकी राष्ट्रपती’ या पुस्तकात अतुल कहाते यांनी घेतला आहे.
जस्ट मॅरीड, प्लीज एक्सक्यूज
लेखक : यशोधरा लाल
अनुवाद : नीता गद्रे
किंमत : २५० रुपये.
पाने : २२२
गावाकडे राहणारा विजय आणि शहरी वळणाची यशोधरा यांची लग्न गाठ बांधली जाते आणि त्यांची संसारकथा सुरू होते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना कशा प्रकारे एकमेकांशी जुळवून घ्यावे लागते. तसेच एकमेकांच्या कुटुंबीयांशी कसे सांभाळावे लागते यांची माहिती हलक्या फुलक्या किश्श्यांमधून या पुस्तकात मांडण्यात आली आहे. नवीन लग्न झाल्यानंतर करावी लागणारी कसरत, परस्पर नातेसंबंध, मातृत्व अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे.
द Facebook इफेक्ट
लेखक : डेव्हिड कर्कपॅट्रिक
अनुवाद : वर्षा वेलणकर
किंमत : ३९५ रुपये.
पाने : ३९४
‘फेसबुक’ हे नाव आजमितीला घराघरांत पोचले आहे. आजच्या पिढीत तर फेसबुक वापरत नसेल असा माणूस सापडणे विरळ आहे. संपूर्ण जगाला अल्पावधीत वेड लावणाऱ्या या फेसबुकचा रंजक आहे. छोट्या कॉलेजपासून सुरू झालेल्या ‘फेसबुक’चा शोध नेमका कसा लागला? त्याची वाढ कशी झाली? फेसबुकचा जडणघडण, फेसबुकचे भविष्य अशा अनेक प्रश्नांवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.