‘क्‍लिक’ होणारे वेगळे करिअर 

प्रसाद दाबके 
सोमवार, 3 जून 2019

करिअर विशेष
सध्या सर्वसामन्यांना सगळ्यात सुटसुटीत आणि सोपं माध्यम जर कुठलं असेल तर ते म्हणजे  ‘फोटोग्राफी’ म्हटलं तर अतिशय अवघड नाही, तर अतिशय सोपं! सोपं अशा करता की, यात तुम्हाला काहीच करायचं नाहीये, एक कॅमेरा उचलायचा आणि फोटो काढत सुटायचं. मग ते घरातले असोत वा बाहेरचे. तुमच्याकडे महागडा कॅमेरा असलाच पाहिजे असं नाहीये एखादा साधा फोन ही चालेल आणि अवघड अशाकरता की कॅमेऱ्यामागची जी नजर आहे ती मात्र सगळ्यांकडे असतेच असं नाही त्याचा मात्र तुम्हाला अभ्यास करावा लागतो.

पूर्वी म्हणजे रोल कॅमेरे असताना फोटोग्राफी ही तितकी सोपी नव्हती. कॅमेरे अतिशय महाग होते. शिवाय प्रत्यक्ष फोटो काढून, रोल डेव्हलपमेंट होऊन आपल्या हातात त्याची प्रिंट येण्याकरता सुरवातीला खूप वेळ लागत असे. कॅमेरे ही जड होते तंत्रज्ञानही जुनाट होतं. त्यामुळे फोटोग्राफी करणारा वर्ग हा अतिशय मर्यादित होता.

आपल्याकडे साधारण सन २००० पासून डिजिटल माध्यमातून फोटो काढायला सुरवात झाली. कॅमेरे स्वस्त होत गेले शिवाय वापरायलाही अतिशय सोपे, वेगवान होत गेले. (आता तर तुमच्या हातातल्या टीचभर mobile ही तुम्ही अतिशय दर्जेदार फोटो काढू शकता.) तेव्हा हळूहळू ही कला सोपी होत गेली. त्या वेळेला त्याचे साधारण दोन ढोबळ प्रकार होते, एक निसर्गरम्य फोटोग्राफी म्हणजे ज्याला आपण landscape ग्राफी म्हणतो आणि दुसरी आहे ती माणसांची ज्याला आपण portrait ग्राफी म्हणतो.

portrait photography :
 हा प्रकार थोडासा महागडा आहे म्हणजे त्याच्या करता तुम्हाला उत्तम छायाचित्र घेणारा कॅमेरा हाताशी पाहिजे ज्याची किंमत अंदाजे लाखभर रुपयापासून सुरू होते. शिवाय जिथे फोटो काढणार ती स्टुडिओची जागा, lights, कामावर असलेली माणसं या करता भरपूर मेहनत आणि पैशाची आवश्‍यकता आहे. काही काळ तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या फोटोग्राफरच्या हाताखाली शिकावं लागेल. उत्तम मासिके, लेख वर्तमानपत्र, website या करता या प्रकारचे फोटो वापरले जातात.

याचाच पुढचा प्रकार आणि सध्याचा लोकप्रिय प्रकार म्हणजे wedding photography - एक उत्तम टीम गोळा करून तुम्ही ही फोटोग्राफी करू शकता यात सुद्धा हल्ली व्हिडिओ शूटिंगपासून ते pre-wedding आणि post wedding ही करू शकता..या क्षेत्रात अगदी तुम्ही नवखे जरी असलात तरी. मात्र स्पर्धेत टिकून राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. कारण आजकाल जिकडे तिकडे कॅमेरा घेऊन हजारो फोटोग्राफर तयार आहेत..अर्थात त्या करता तुम्हाला तुमचं काम creative बनवावं लागेल.

लॅन्डस्केप फोटोग्रेफी / ट्रॅव्हल फोटोग्राफी : 
हा तसा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. यात तुम्ही प्राणी, पक्षी, निसर्ग या सारखे असंख्य विषय निवडू शकता, एखाद्या चांगल्या कंपनीत तुम्ही तुमचे फोटो घेऊन काम करू शकता किंवा website वर हे फोटो विकू शकता.. तुमचे वयक्तिक प्रदर्शन ही भरवू शकता; पण यात खात्रीशीर पैसे मिळतीलच याची काही शाश्वती नसते...किंवा तुमचे तुम्ही travel करत फोटो काढत फिरू शकता. पण याच्याकरिता आर्थिक पाठबळ असणं आवश्‍यक आहे.

कॅन्डीड फोटोग्राफी  
हा आत्ताच्या काळातला सगळ्यात सोपा आणि स्वस्त प्रकार आहे. याला उत्स्फूर्त photography असं ही म्हणता येईल. यात तुमचा काही कंट्रोल नसतो, म्हणजे रस्त्यांनी जाताना एखादी चांगली दिसणारी फ्रेम तुम्ही तुमच्या mobile ध्ये टिपू शकता पण त्या करता समोरच्या मॉडेल वर/व्यक्तीवर पडणारा light तुम्ही ठरवू शकत नाही. किंवा त्यांनी काय हावभाव केले पाहिजेत हेही तुम्ही ठरवू शकत नाही. थोडक्‍यात हा थोडा नशिबाचा आणि सरावाचा भाग आहे. हे photo तुम्ही online विकू शकता magazine ला पाठवू शकता. Instagram सारख्या ठिकाणी याच्या खूप स्पर्धा सतत चालू असतात त्यात तुम्ही भाग घेऊ शकता. थोडक्‍यात एक छंद म्हणून तुम्ही या प्रकारातून सुरवात करू शकता.

Industrial photography, product राफी event photography हे सगळे प्रकार थोड्याफार फरकाने व्यावसायिक फोटोग्राफीचेच भाग आहेत या करता तुम्हाला स्टुडिओ setup, चांगली टीम याची गरज लागतेच. यात खरे आव्हान आहे ते तगड्या स्पर्धेचे. याची काही प्रमुख कारण म्हणजे

कॅमेरे अतिशय स्वस्त झालेत. आयफोनसारख्या फोन वर तुम्ही अतिशय उच्च दर्जाची छायाचित्रे मिळवू शकता. क्‍लिष्टता राहिली नाही (उदा. रोल डेव्हलपमेंट, प्रिंटिंग.) सहज उपलब्ध असलेली माहिती ती तुम्ही वेबच्या अथवा मासिकाच्या द्वारे सहज मिळवू शकता. या करता चांगल्या फोटोग्राफरचं काम बघणे त्यांच्या workshop ध्ये सहभागी होणे हे आवश्‍यक आहे. या सगळ्यातून तुम्हाला तुमची वेगळी शैली निर्माण करायची आहे, त्या करता जे दिसेल ते टिपण्यासाठी तुम्ही तयार असल पाहिजे..हजारो फोटो काढले पाहिजेत त्या करता पडेल ते कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे. पण सगळ्यात महत्वाच हे आहे की कला असणं आणि आपली कला विकता येणं यातला balance तुम्हाला कळला पाहिजे.

गेले दहा-अकरा वर्ष मी फोटोग्राफी करतोय. माझीही सुरुवात एका travel photography च्या assignment झाली. त्या नंतर हळूहळू मित्रांचे फोटो काढ , कोणाला पोर्टफोलिओ करून दे. मग एका ओळखीतून दुसरी काम मिळत गेली. मधल्या काळात फिल्म करता फोटो काढले. या शिवाय भारतभर भ्रमण करून एक उत्तम छायाचित्रणाचा अनुभव माझ्याकडे जमा झाला. माझी नजर सुधारण्यासाठी या सगळ्याचा मला खूप फायदा झाला आणि होतोय.

कारण शेवटी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी तुम्हाला तुमची vision वाढवणं अतिशय गरजेच असतं. त्या करता आजूबाजूला काय चालू आहे याचं भान ठेवणं, येणाऱ्या नवीन नवीन उपकरणाशी आपण सतत up to date राहणं या गोष्टी ही आवश्‍यक आहेत.. तुम्ही बघून जेवढं शिकता त्यातून तुमची नजर हळूहळू तयार होत जाते. मुळात ही कला काही लगेच पैसे मिळवून देणारी नाही आहे.. त्या करता काही महिने लागू शकतात किंवा काही वर्ष सुद्धा. सतत काम करत राहणं हा यावरचा एकमेव उपाय आहे.   

संबंधित बातम्या