हेन्री मोर

 मधुरा पेंडसे
गुरुवार, 8 मार्च 2018

चित्र-गमती 
चित्रातले जग कसे असते?

कसले शिल्प असेल हे? एक व्यक्ती पहुडल्यासारखी दिसतेय. तुम्हाला त्याचं डोकं दिसतंय? आणि गुडघे? पोट कुठे गेलेय? पोटाच्या जागी एक भोक दिसतेय!

हेन्री मोर हा शिल्पकार माणसांच्या खडबडीत - ज्यांच्यामध्ये रिकाम्या जागा दिसतात अशा शिल्पांसाठी प्रसिद्ध होता. याची बहुतांश शिल्पे स्त्रियांच्या आकृतींची असायची. काही शिल्पांमध्ये फक्त चेहरे दिसतात. 

हेन्रीचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. याने तिथल्या डोंगरांची रेखाटने केली. या मोकळ्या टेकड्यांवर फिरताना तो वेगवेगळ्या आकारांचे दगड, वाळलेल्या वाकड्या तिकड्या फांद्या आणि मुळे गोळा करीत असे. त्याच्या शिल्पांमध्ये निसर्गाची झलक दिसते तुम्हाला? 

हेन्री मोर हा मुख्यत्वे त्याच्या शिल्पांसाठी नावाजला; पण तो रेखाटनेही करीत असे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्याने अनेक स्केचेस केली. ट्यूबमध्ये लपलेल्या अंधारातील मनुष्याकृतींच्या या रेखाटनांत त्याने क्रेयॉन आणि जलरंग वापरले आहेत. 

क्रेयॉनवरून जलरंग घसरतात मग आजूबाजूची जागा रंगाने भरवायची - अशी या रेखाटनांची पद्धत आहे. तुम्हाला क्रेयॉन आणि जलरंगांनी स्केच करून पाहायला आवडेल? 

आया कोबायाशी या नृत्यांगनेने हेन्रीच्या शिल्पांप्रमाणे स्वतःचे शरीर वापरून आकार बनवून पहिले. तुम्हीसुद्धा हा प्रयोग करून पाहा!

फोटो फीचर

संबंधित बातम्या