राक्षस 

मधुरा पेंडसे
मंगळवार, 17 जुलै 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

या कुत्र्याच्या डोक्‍याला हात न लावलेलाच बरा! ग्रीक मिथकात पाताळाच्या दरवाजाचे रक्षण करणाऱ्या, तीन डोकी असलेल्या या कुत्र्याचे नाव सरबरस आहे. तुम्ही हॅरी पॉटरची पुस्तके वाचली असतील किंवा सिनेमा पहिला असेल तर हा तुमच्या ओळखीचाच असेल.

हुश्‍श! हे चित्र काही तितके भयंकर दिसत नाही! हे राक्षस जरा मजेशीर दिसताहेत. माणूस, प्राणी आणि पक्षी यांच्या मिसळीने तयार झालेले हे चित्र आहे. अपेल हा चित्रकार कोब्रा (CoBrA) कला चळवळीचा एक आर्टिस्ट होता. या चळवळीच्या नावात तीन शहरांची नावे आहेत. कोपनहेगन, ब्रसेल्स आणि अमस्टरडॅम! या चळवळीच्या मागची कल्पना अशी, की लहान मुले जशी चित्रे काढतात तशी चित्रे काढायची! मोठ्यांसारखी बोअरिंग चित्रे काढायची नाहीत, या कल्पनेनी अपेलला आनंद झाला होता. त्याने चित्राचे नाव ठेवले ‘हिप हिप हुर्रे!’

हा राक्षस आईलीन ऐगरनी काढला आहे. इंग्लंडच्या कॉर्नवॉल शहरात समुद्रकिनारी हा दगड तिला दिसला. तिला अनेक दगडांमध्ये राक्षसांच्या चेहऱ्याचे आकार दिसायचे. तिच्या मते हे समुद्राजवळ झोपलेले आदिम राक्षसच होते.

दगडांचे हे आकार कोणी मुद्दाम बनवले नव्हते. समुद्री वाऱ्यांनी आणि पाण्यामुळे दगडांची झीज होते आणि त्यामुळेच असे गमतीशीर आकार तयार होतात. आईलीन या राक्षसांना रॉकफेस, बम अँड थम अशी नावेही द्यायची.

पुण्यातील चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी हे भुताचे चित्र काढले आहे. यामध्ये तुम्हाला अक्षर किंवा आकडा दिसतोय? या चित्रांना ते अक्षरांचे व्यक्तिचित्रण म्हणतात! उजवीकडचे चित्र म्हणजे मृत अक्षरांच्या भुतावळीतल्या ‘भ’चे पोर्ट्रेट आहे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या