समुद्री जीव
चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?
आवडतो मज अफाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेस फुलांचे सफेद शिंपीत, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे
- कुसुमाग्रज
मित्रांनो, तुम्हाला समुद्रावर जायला आवडते? समुद्रकिनारी काय काय दिसते? काय काय सापडते?
अनेक चित्रकारांनी मासा या विषयावर चित्र काढली आहेत. हे स्कॉटी विल्सनने (Scottie Wilson) केलेले वरील रेखाटन आहे. हे स्केच त्याने समुद्रकिनारी काढले असावे असे त्याच्या शैलीतून वाटते.
हे कसले चित्र आहे? या चित्रातल्या मोठ्या प्राण्याचा आकार कसा दिसतोय? या समुद्री राक्षसाला काढले आहे पिएर अलेशिंस्की (Pierre Alechinsky) या आर्टिस्टने!
समुद्रकिनारी चमकदार शिंपले शोधत तासन्तास घालवायला काय मजा येते ना! फ्रान्सिस हॉजकिन (Frances Hodgkins) या चित्रकर्तीने हे शिंपले गोळा केले आणि त्याचे चित्र काढले. कलाकार कल्पक असतात. या चित्राकडे पाहून असे वाटेल, की हे कुठल्याशा बेटावर काढलेले आहे. बाल्कनीत बसलेला पोपट दिसतोय? खरेतर हे चित्र तिने लंडनमध्ये काढले आहे.
देवमासा आणि हातात पॅलेट घेऊन? हे नेहमी दिसणारे दृश्य नाही. चित्र काढणारा मासा कदाचित कधीच दिसणार नाही, पण अशा कल्पना करायला मजा येते ना? विलियम रॉबर्टस (William Roberts) याने हे स्केच केले
आहे.