मैदाने 

मधुरा पेंडसे
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

चित्र गमती
चित्रातले जग कसे असते?

मित्रांनो, मैदानावर किती तरी गोष्टी दिसतात. काही जण हेडफोनवर गाणी ऐकत धावत असतात, काही क्रिकेट - फुटबॉलच्या ग्रुपबरोबर सराव करताना दिसतात, काही मंडळी ग्राउंडची डागडुजी करत असतात आणि काही सेल्फी काढण्यात व्यग्र दिसतात. 

वेसली कॅनडिनस्की (Wassily Kandinsky) या रशियन चित्रकाराला वाटे, रेषा आणि आकार पाहून आपला मूड बदलू शकतो. म्हणजे एखादे मस्त गाणे ऐकून आनंदी वाटते किंवा तालावर पाय हलायला लागतात तसे! चित्र काढायचे म्हणजे मधुर संगीत बनवल्यासारखे आहे असे तो म्हणे. या चित्राचे नाव आहे ‘स्विंगिंग’; मैदानावर खेळताना धमाल येते ना? 

Wolfgang Suschitzky याने लंडनमध्ये असताना लोकांच्या दैनंदिन जीवनाचे अनेक फोटो काढले. हा फोटोदेखील तसाच आहे. या फोटोमधली माणसे उंच झोके घेताहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहा. कसा काढला असेल हा फोटो? 

मैदाने नाही मिळाली, तर बिल्डिंगच्या आवारातच क्रिकेटपासून लगोरीपर्यंतचे खेळ रंगतात. सूनी तारापोरवाला हिने हा फोटो मुंबईच्या एका इमारतीच्या आवारात काढलेला आहे. ही एक फिल्ममेकर, लेखक आणि फोटोग्राफर आहे. ‘अ लाँग जर्नी’ या चित्रपटाच्या सेटवर रोशन सेठ हा अभिनेता बालकलाकाराशी खेळतानाचा एक क्षण तिने टिपला आहे. 

हे काही मैदान नाही, तर एक इन्स्टॉलेशन आहे! अर्थातच हे एका कलादालनात मांडले आहे. 

रॉबर्ट मॉरिस  (Robert Morris) या कलाकाराला ‘टेट’ या लंडनच्या आर्ट गॅलरीत बोलावले होते. त्याने ही गमतीशीर रचना उभी केली. खरेतर कलादालनातील वस्तूंना हातदेखील लावायचा नसतो. पण या रचनेवर लोकांना उभे राहायला, रंगायला, उड्या मारायला सांगितले जात असे. यासाठी त्याने मोठाले बोगदे, उंचावर प्लॅटफॉर्म आणि असे ओंडके यांची मजेशीर रचना केली होती.

फोटो फीचर

संबंधित बातम्या