कॉफी स्पेशल कोटेबल कोट्‌स

विचारवंत
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

कोटेबल कोट्‌स
 

आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात; पण आपण सुदृढ नसतो, आपली रात्रीची झोप नीट झालेली नसते, आपण थोडे उदास असतो. कॉफीचा एक कप या सगळ्या समस्या सोडवू शकतो.
- जेरी सीनफिल्ड, कॉमेडियन


सकाळी घेतलेली कॉफी वेगळाच आनंद देऊन जाते, जो दुपारच्या किंवा संध्याकाळच्या चहाने मिळत नाही.
- ऑलिव्हर वेंडल होम्स, अमेरिकन फिजिशियन व कवी


एक सोफा, एक पुस्तक आणि एक कॉफीचा कप... यापेक्षा आणखी सुख कशात असू शकते?
- अँथनी ट्रोलोप, ब्रिटिश कादंबरीकार


माझ्या मते, नुकत्याच केलेल्या कॉफीचा सुगंध म्हणजे एक मोठा शोध आहे. 
- ह्युग जॅकमन, अभिनेता


टेबलवर असलेल्या अनेक गोष्टींमध्ये कॉफीला सर्वात मूल्यवान म्हणता येईल. ती नशा न आणता उत्साह वाढवते आणि विचारांना दिशा देते... आणि उदासपणा, सुस्ती, दुर्बलता यांना लांब ठेवते.
- बेंजामिन फ्रँकलिन


कॉफीची स्वतःचीच एक वेगळी भाषा आहे. 
- जॅकी चॅन, अभिनेता

 

संबंधित बातम्या