दोशाची चटणी 

साहित्यलक्ष्मी देशपांडे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कुकिंग-बिकिंग
शिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा?’ हे सांगणारे हे सदर.

साहित्य : अर्धी वाटी दही, अर्धी वाटी चण्याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी किसलेले सुके खोबरे, एक - दोन लाल मिरच्या, कोथिंबीर, कढीलिंबाची पाने, एक टीस्पून मीठ, दोन टीस्पून साखर, फोडणीसाठी दोन टीस्पून तेल, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा तिखट, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद. 

कृती : कढईत एक चमचा तेल घालून त्यात चण्याची व उडदाची डाळ वेगवेगळी खमंग लाल भाजून घ्यावी. त्यातच खोबरे व मिरचीही भाजून घ्यावी. हे भाजलेले पदार्थ मिक्‍सरमधून छान बारीक करून घ्यावेत व त्यात दही, साखर, मीठ, कढीलिंबाची पाने घालून जाडसर वाटून घ्यावे. हवी असल्यास दोन चमचे तेलाची मोहोरी, हिंग, हळद, कढीलिंबाची पाने व लाल मिरच्यांची खमंग फोडणी करून त्यावर घालावी. फोडणीशिवायही ही चटणी छान लागते. दोशाबरोबर ही चटणी अप्रतिम लागते.

संबंधित बातम्या