पाऊस शब्दकोडे 

किशोर देवधर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पाऊस शब्दकोडे

आडवे शब्द : 
१. पाठीवर सहा ठिपके असलेला हा तांबडा कीटक पावसाच्या आगमनाची चाहूल देतो, याला कुंकवाचा किडा असेही संबोधले जाते, 
३. नद्या नाल्यांच्या काठी ओलसर जागी आढळणारा एक पानझडी वृक्ष ज्याला वरुण असेही म्हणतात, 
५. संधी, शिरकाव करण्यास जागा, 
७. क्रमिक पुस्तकातील पाठ किंवा शिकवण, 
९. बग्गी, घोडागाडी, 
१०. या लहान विहिरीत असेल तरच पोहऱ्यात पाणी येते, 
११. हानी, तोटा, 
१३. प्रयत्नांची शर्थ, 
१५. स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा दगड, 
१६. अखंड पडणाऱ्या पावसाचे एक विशेषण, 
१९. अभिप्राय, विचार, 
२०. युद्ध किंवा वाळवंट, 
२२. पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर, 
२३. द्वीप, पाण्याने वेढलेली जमीन, 
२४. जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे भारताच्या मेघालयातील स्थान, 
२५. शेळीचे पिल्लू, 
२७. संन्याशाचे जलपात्र, 
२८. आपल्याकडील शेतीचा पहिला हंगाम 

उभे शब्द : 
१. सकाळी पश्‍चिम क्षितिजावर हा सप्तरंगी पट्टा दिसला तर पाऊस येणार आहे असे समजले जाते, 
२. गाई म्हशी ठेवण्याची जागा, 
३. चक्रीवादळ, 
४. सहा ऋतूंपैकी एक किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाचे नाव, 
५. डावा किंवा प्रतिकूल, 
६. संकोची, लाजाळू, 
८. टपाल, पत्रे, 
९. एक हजार किलोचे वजन, 
१०. मनातील वैरभाव, सूडबुद्धी, 
१२. अयोध्यानगरी, 
१३. गुलाबी फुले येणाऱ्या या वृक्षाच्या विलायती जातीला पर्जन्यवृक्ष असे म्हटले जाते, कारण त्यावरील सिकाडा किड्यांच्या शरीरातील पाणी पाने हलल्यावर खाली पडते, 
१४. भरती, 
१६. साधू, सज्जन, 
१७. पोत्याचा तुकडा, 
१८. समस्त, एकूण एक, 
१९. हिरव्या रंगाचे रत्न, पाचू, 
२१. ख्याती, कीर्ती, 
२२. सर्वसाधारण प्रमाण, सध्या चार-पाच दिवसांतच पावसाचे हे पूर्ण होते, 
२३. चांगला पाऊस यावा म्हणून या प्राण्याचे लग्न लावण्याची प्रथा आहे, 
२६. हौद किंवा यज्ञाची खाच

संबंधित बातम्या