तंत्रकौशल्याचा आधार

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी

इंडो-जर्मन टूल/इंडो-डॅनिश स्कूल या संस्था भारत सरकाच्या सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. उद्योगांना आणि विशेषतः टूल आणि डाय उद्योगांना लागणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या हेतूने हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सैद्धांतिक बाबींबरोबर प्रात्यक्षिकांवर अधिक भर दिला जातो. विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगारक्षम केले जाते. या अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे.

इंडो डॅनिश टूल रूम -
या संस्थेने चार वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग हा कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू केला आहे. 

पात्रता ः गणित आणि विज्ञान या विषयांसह दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. विज्ञान विषयामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के व राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत. खुल्या संवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते १९ वर्षे या दरम्यान असावे. राखीव संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. १२० उमेदवारांना प्रवेश दिला जातो.

संपर्क ः फोर (पार्ट), फेज सिक्स, टाटा कांद्रा रोड, गमहरिया, जमशेदपूर - ८३२१०८, दूरध्वनी ः ०६५७-२२०१२६१, फॅक्स - २२०२७२३, ईमेल ः reach@idtrjamshedpur.com, संकेतस्थळ ः www.idtrt.gov.in

टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर, पाटणा
या संस्थेमध्ये पुढील तीन अभ्यासक्रम करता येतात- (१) डिप्लोमा इन टूल अँड डाय अंडर मेकॅनिकल इंजिनिअरिंग. कालावधी- चार वर्षे. (२) डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, कालावधी- तीन वर्षे. (३) डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग. कालावधी- तीन वर्षे.

पात्रता - गणित आणि विज्ञान या विषयांसह दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. विज्ञान विषयामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के व राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत. खुल्या संवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते १९ वर्षे या दरम्यान असावे. राखीव संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येते. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क ः पाटलीपुत्र इंडस्ट्रियल एरिया, पाटणा - ८०००१३, टेलिफॅक्स ः ०६१२-२२७०७४४,  संकेतस्थळ ः www.idtr.gov.in ईमेल ः trtcpatna१४@gmail.com

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टूल डिझाइन, बंगळूर
संस्थेचे अभ्यासक्रम ः

(१) डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनिअरिंग. कालावधी ः तीन वर्षे. पात्रता ः दहावी उत्तीर्ण. (२) डिप्लोमा इन ऑटोमेशन अँड रोबोटिक इंजिनिअरिंग. कालावधी ः तीन वर्षे. पात्रता ः दहावी उत्तीर्ण. (३) डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. कालावधी ः तीन वर्षे. पात्रता ः दहावी उत्तीर्ण. (४) डिप्लोमा इन टूल अँड डाय मोल्ड मेकिंग. कालावधी ः चार वर्षे. पात्रता ः गणित आणि विज्ञान या विषयांसह दहावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. विज्ञान विषयामध्ये रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या दोन विषयांचा समावेश असणे आवश्यक आहे. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के व राखीव संवर्गातील उमेदवारांना किमान ४५ टक्के गुण मिळायला हवेत. खुल्या संवर्गातील उमेदवाराचे वय १५ ते १९ वर्षे या दरम्यान असावे. राखीव संवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येते. या सर्व अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.

संपर्क ः बालानगर, हैदराबाद - ५०००३७, दूरध्वनी ः ०४०-२३७७१९५९, ईमेल ः adminltrg@citdindia.org

इंडो-जर्मन टूल रूम, अहमदाबाद
संस्थेचे अभ्यासक्रम ः

 1. पोस्ट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड रोबोटिक्स,  कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः बी.ई. मेकॅनिकल/प्रॉडक्शन/मेकॅट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल.
 2. पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाइन अँड कॉम्प्युटर एडेड डिझाइन, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः बी.ई. मेकॅनिकल/ऑटो/प्लॅस्टिक/टूल अँड डाय इंजिनिअरिंग.
 3. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाइन अँड कॉम्प्युटर एडेड डिझाइन, कालावधी ः दीड वर्ष. पात्रता ः बी.ई. मेकॅनिकल/ऑटो/प्लॅस्टिक/टूल अँड डाय इंजिनिअरिंग.
 4. कंडेन्स्ड कोर्स इन टूल अँड डाय मेकिंग, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः दहावी उत्तीर्ण. 

अभ्यासक्रम क्रमांक एक ते चार अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी निःशुल्क आहेत.

पुढील अभ्यासक्रम इतर मागास वर्ग आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क आहेत.

 1.  मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टेक्नॉलॉजी, पात्रता ः मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका, कालावधी ः सहा महिने.
 2.  मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मिलिंग, पात्रता ः दहावी उत्तीर्ण, कालावधी ः सहा महिने.
 3.  मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग, पात्रता ः दहावी उत्तीर्ण, कालावधी ः सहा महिने.
 4. मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन मेकॅट्रॉनिक्स, पात्रता ः इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/प्रॉडक्शन/मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेतील पदवी किंवा पदविका, कालावधी ः सहा महिने.संपर्क ः प्लॉट ५००३, फेज चार, जीआयडीसी, मेहमेदाबाद रोड, अहमदाबाद - ३८२४४५, संकेतस्थळ ः https://www.igtrahd.com/

इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद 

 1. (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाइन अँड कॉम्प्युटर एडेड डिझाइन, कालावधी ः दीड वर्षे. पात्रता ः बी.ई. मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन.
 2. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅनिकल प्रॉडक्ट डिझाइन, कालावधी ः दीड वर्षे. पात्रता ः बी.ई. मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन.
 3. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, कालावधी ः दीड वर्षे. पात्रता ः बी.ई. मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल.
 4. पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाइन अँड कॉम्प्युटर एडेड डिझाइन, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन.
 5. पोस्ट डिप्लोमा इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन.
 6.  पोस्ट डिप्लोमा इन कॉम्प्युटर एडेड इंजिनिअरिंग, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन.
 7. पोस्ट डिप्लोमा प्रॉडक्ट डिझाइन, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/ऑटोमोबाईल /प्रॉडक्शन.
 8. (८) पोस्ट डिप्लोमा इन सीएनसी मशिन मेंटेनन्स, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन.
 9. (९) पोस्ट डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/ऑटोमोबाईल/प्रॉडक्शन.
 10. पोस्ट डिप्लोमा इन व्हीएलएसआय अँड एम्बेडेड सिस्टीम्स, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन.
 11. पोस्ट डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः पदवी किंवा पदविका - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन.
 12. ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाइन, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा आयटीआय - टर्नर किंवा मेकॅनिस्ट/बेंच फिटर किंवा टूल अँड डाय मेकर.
 13. ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन टूल अँड डाय मॅन्युफॅक्चरिंग, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा आयटीआय-टर्नर किंवा मेकॅनिस्ट/बेंच फिटर किंवा टूल अँड डाय मेकर.
 14. ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी मशिनिंग, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा आयटीआय-टर्नर किंवा मेकॅनिस्ट/बेंच फिटर किंवा टूल अँड डाय मेकर.
 15. ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा आयटीआय- टर्नर किंवा मेकॅनिस्ट/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा टूल अँड डाय मेकर.
 16. ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेट कोर्स इन वेल्डिंग टेक्नॉलॉजी, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः मेकॅनिकल किंवा प्रॉडक्शन अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा आयटीआय- टर्नर किंवा मेकॅनिस्ट/इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा टूल अँड डाय मेकर.
 17. सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निंग अँड मिलिंग, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः दहावी उत्तीर्ण.
 18. (१८) सर्टिफिकेट कोर्स इन मशिन टूल ऑपरेशन अँड वेल्डिंग ऑपरेशन, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः दहावी उत्तीर्ण.
 19. सर्टिफिकेट कोर्स इन मशिन मेंटेनन्स अँड वेल्डिंग ऑपरेशन, कालावधी ः एक वर्ष. पात्रता ः दहावी उत्तीर्ण.संपर्क ः पी ३१, एमआयडीसी, इंडस्ट्रियल एरिया, चिखलठाणा - ४३१००६, दूरध्वनी- ०२४०-२४८६८३२, फॅक्स- २४८४०२८,  संकेतस्थळ ः gtr-aur.org ईमेल ः gm@gtr-aur.org

संबंधित बातम्या