अभियांत्रिकी क्षेत्र

सुरेश  वांदिले
मंगळवार, 28 जुलै 2020

कव्हर स्टोरी

गेल्या काही वर्षांत देशातील काही खासगी अभियांत्रिकी संस्थांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मोठी झेप घेतली आहे. यातील बहुतेक संस्थांना स्वायत्तता मिळाली असल्याने, आधुनिक काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम या संस्थांनी सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम वर्षानुवर्षे तसेच सुरू राहावेत, असा या संस्थांचा दृष्टिकोन दिसत नाही. औद्योगिक जगतास आवश्यक असणारे तंत्रज्ञान आणि कौशल्य याची जाण ठेवून तत्परतेने अभ्यासक्रमांमध्ये बदल केला जातो.

या संस्थांमध्ये प्रवेशासाठी एंट्रन्स घेतली जाते. यातील काही संस्थांमधील प्रवेशासाठी विचार करण्यास हरकत नसावी. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग (एनईआरएफ) फ्रेमवर्क या उपक्रमांतर्गत विविध ज्ञानशाखांचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. त्यामध्ये यातील बहुतेक संस्थांचा क्रमांक पहिल्या ५० मध्ये लागतो.

यापैकी काही संस्था पुढीलप्रमाणे-

अम्रिता विश्‍वविद्यापीठम
कोईम्बतूर येथील अम्रिता विश्‍वविद्यापीठमने विविध ज्ञानशाखांच्या दर्जेदार शिक्षण प्रशिक्षणांमध्ये सातत्य ठेवले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने या विद्यापीठाला इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स हा दर्जा दिला आहे. या विद्यापीठाच्या अंतर्गत कार्यरत अम्रिता स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे कोईम्बतूर, अमरावती (आंध्रप्रदेश),अम्रितापुरी, बंगळूर, चेन्नई येथे कॅम्पस आहेत. या संस्थेतील विविध शाखांच्या प्रवेशासाठी जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन-मेन्स आणि अम्रिता एंट्रन्स एक्झामिनेशनमधील गुण ग्राह्य धरले जातात. 

या संस्थेत पुढील शाखांमध्ये बी.टेक. अभ्यासक्रम करता येतो. केमिकल इंजिनिअरिंग (कॅम्पस- कोईम्बतूर), एरोस्पेस इंजिनिअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर), कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (कॅम्पस-कोईम्बतूर), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कॅम्पस-कोईम्बतूर, बंगळूर आणि अम्रितापुरी), याशिवाय केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांमध्ये बारावीनंतर इंटिग्रेटेड एम.एस्सी. अभ्यासक्रम कोईम्बतूर कॅम्पसमध्ये करता येतो.
संपर्क ः अम्रिता विश्‍वविद्यापीठम, अम्रितापुरी कॅम्पस, अम्रितापुरी क्लॅप्पाना पोस्ट ऑफिस कोल्लम केरळ - ६९०५२५, दूरध्वनी ः ०४७६- २८०१२८०, फॅक्स ः २८९६१७८, 
संकेतस्थळ ः https://www.amrita.edu/ 
ईमेल ः btech@amrita.edu 

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 
या संस्थेचे भोपाळ, वेल्लोर, चेन्नई आणि आंध्रपद्रेश या ठिकाणी कॅम्पस आहेत. या संस्थेत पुढील शाखांमध्ये बी.टेक. अभ्यासक्रम करता येतो - या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी व्हीआयटी एंट्रन्स एक्झामिनेशन घेतली जाते. ही परीक्षा बारावी विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या अभ्यासक्रमांवर आधारित ऑनलाइन वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची परीक्षा आहे.

ही आपल्या देशातील महत्त्वाची खासगी संस्था आहे. संस्थेची सातत्यपूर्ण दर्जेदार शैक्षणिक कामगिरी लक्षात घेऊन या संस्थेस भारत सरकारने इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स, हा दर्जा दिला आहे. यामुळे या संस्थेला अनेक नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याची स्वायत्तता प्राप्त झाली आहे.

स्पेशलायझेशन ः 
 कॉम्प्युटर सायन्स ः संगणकीय अभ्यासक्रमांच्या स्पेशलायझेनच्या सध्याच्या काळात सर्वाधिक मागणी असणारे पुढील अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) इन्फर्मेशन सिक्युरिटी, (२) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (३) सायबर फिजिकल सिस्टिम्स, (४) बिझनेस सिस्टिम्स (हा अभ्यासक्रम टीसीएस कंपनीच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.), (५) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, (६) डेटा सायन्स, (७) डेटा ॲनॅलिटिक्स, (८) नेटवर्किंग अँड सिक्युरिटी, (९) गेमिंग टेक्नॉलॉजी, (१०) सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक, (११) ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, (१२) आर्टिफिशिअल टेक्नॉलॉजी अँड रोबोटिक्स. 

 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन ः (१) रोबोटिक्स, (२) बायोइन्फोमेटिक्स.  इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन ः (१) बायोमेडिकल इंजिनिअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड सायबरमेटिक्स.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन ः 
(१) ऑटोमेटिव्ह इंजिनिअरिंग, (२) गेमिफिकेशन, (३) प्रॉडक्शन अँड इंडस्ट्रिअल इंजिनिअरिंग, (४) मेकॅट्रॉनिक्स अँड ऑटोमेशन.

या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या ठिकाणी सोय केली जाते. 
संपर्क ः व्हीआयटी, वेल्लोर - ६३२०१४, तामिळनाडू, दूरध्वनी ः ०४१६- २२४३०९१, 
संकेतस्थळ ः vit.ac.in, ईमेल ः info@vit.ac.in

एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 
या संस्थेचे सोनपत (हरयाणा), एनसीआर-दिल्ली आणि अमरावती (आंध्रप्रदेश) येथे कॅम्पस आहेत. संस्थेने पारंपरिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांबरोबरच आधुनिक विषयांचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. 

 कॉम्प्युटर सायन्स विथ स्पेशलायझेशन इन ः (१) सायबर सिक्युरिटी, (२) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, 
(३) बिग डेटा ॲनॅलिटिक्स, (४) क्लाऊड कॉम्प्युटिंग, (५) नेटवर्किंग, (६) इंटरनेट ऑफ थिंग्ज. 

 इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ः (१) स्मार्ट ग्रीड कॅरेक्टिरिस्टिक्स अँड डिझाइन, (२) इंडस्ट्रिअल ऑटोमेशन अँड कंट्रोल, (३) नॉनलिनिअर डायनामिकल सिस्टिम्स अँड कंट्रोल.

 इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन ः (१) स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, (२) वायरलेस सेन्सर नेटवर्क, (३) एम्बेडेड सिस्टिम्स डिझाइन, (४) सिग्नल प्रोसेसिंग, (५) इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, (६) व्हीएलएसआय डिझाइन अँड मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टिम्स.

 मेकॅनिकल ः (१) मटेरिअल्स अँड थ्रीडी प्रिंटिंग, (२) रोबोटिक्स अँड मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोटिव्ह, (३) कॉम्प्युटर एडेड डिझाइन.

या अभ्यासक्रमांना एसआरएम जॉइंट इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. ही ऑनलाइन संगणकाधारित-कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, लातूर आणि नाशिक या ठिकाणी सोय करण्यात येते. 
संपर्क ः एसआरएम नगर, कंट्टंककुलाथूर - ६०३२०३, दूरध्वनी ः ०४४-२७४१७०००, फॅक्स ः २७४१७४९९, 
संकेतस्थळ ः srmist.edu.in, ईमेल ः admissions.india@srmist.edu.in

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी 
माहिती तंत्रज्ञान विषयातील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील ही हैदराबाद येथे कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आहे. १९९८ मध्ये या संस्थेची स्थापना सार्वजनिक-खासगी-सहकार्य या तत्त्वावर करण्यात आली. आंध्र सरकार आणि देशातील काही महत्त्वाची औद्योगिक घराणे यांनी या संस्थेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. उच्च दर्जाचे संशोधन व शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली.

या संस्थेत पुढील अभ्यासक्रम करता येतात ः बी.टेक. इन (१) कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, (२) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (३) बी.टेक. अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (४) बी.टेक. अँड मास्टर ऑफ सायन्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (५) बी.टेक. इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, (६) बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटेशनल नॅचरल सायन्सेस बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (७) बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो. (८) बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड मास्टर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटिंग अँड ह्युमन सायन्स बाय रिसर्च. हा अभ्यासक्रम पाच वर्षे कालावधीचा असून तो ड्युएल डिग्री या नावाने ओळखला जातो.

प्रवेश प्रकिया ः संस्थेतील अभ्यासक्रमांना पुढील तीन प्रकारे प्रवेश दिला जातो. (१) बी.टेक. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जेईई-मेन परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. (२) बी.टेक.-ड्युएल डिग्री अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्थेमार्फत अंडरग्रॅज्युएट एंट्रन्स एक्झामिनेशन ही परीक्षा घेतली जाते. बारावी विज्ञान शाखेत रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांमध्ये ६० टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. त्यासाठी महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद येथे सोय करण्यात येते. (३) केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या उड्डाण योजनेत निवडल्या गेलेल्या विद्यार्थिनींना बी.टेक. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा देता येते.
संपर्क ः यूजी ॲडमिशन्स, आयआयआयटी, गाचीबावली, हैदराबाद - ५०००३२, दूरध्वनी ः ४०-६६५३१२५०, 
संकेतस्थळ ः iiit.ac.in, ईमेल ः ugadmissions@iiit.ac.in 

या संस्थेचा शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता मोठी आहे. येथे संशोधनाच्या जागतिक दर्ज्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

मनीपाल ॲकॅडमी फॉर हायर एज्युकेशन
या संस्थेअंतर्गत मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॅालॉजी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी.टेक. इन डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केला आहे. गुणवत्ता आणि दर्जा याबाबत या संस्थने गेल्या काही वर्षांत सातत्य राखले आहे. 

 इतर अभ्यासक्रम ः या संस्थेमध्ये पुढील १६ शाखांमध्ये बी.टेक. अभ्यासक्रम करता येतो - ऑटोमोबाईल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, एरोनॉटिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, बायोमेडिकल, बॉयोटेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, मीडिया टेक्नॉलॉजी, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रिअल अँड प्रॉडक्शन, कॉम्प्युटर अँड कम्युनिकेशन, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन.
प्रवेश प्रकिया ः या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन एंट्रन्स एक्साझमिनेशन घेतली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याला बारावी विज्ञान परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात किमान ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. 
संपर्क ः संकेतस्थळ ः https://manipal.edu/
ईमेल ः admissions@manipal.edu

युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज 
या संस्थेची स्थापना २००३ मध्ये करण्यात आली. स्थापनेपासूनच या संस्थेने औद्योगिक जगताला आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळ निर्मितीसाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम सरू केले आहेत. 

स्पेशलाइज्ड अभ्यासक्रम - कॉम्प्युटर सायन्स
 बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) ब्लॉकचेन, (२) इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर, (३) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, (४) कॉम्प्युटेशनल सस्टेनेबिलिटी, (५) बिग डेटा, (६) बिझनेस ॲनालिटिक्स अँड ऑप्टिमायझेशन, (७) क्लाऊड कॉम्प्युटिंग अँड व्हर्च्युयलायझेशन, (८) सायबर सिक्युरिटी अँड फोरेन्सिक, (९) डेव्हऑप्स, (१०) ग्रॅफिक्स अँड गेमिंग, (११) ऑईल अँड गॅस इन्फॉर्मेटिक्स, (१२) ओपन सोर्स अँड ओपन स्टँडर्ड.निवड प्रकिया ः या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी दोन पद्धतींचा अवलंब केला जातो. (१) देशभरातील विविध ठिकाणी ऑनलाइन इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा देण्याची सोय करण्यात येते. 
पात्रता ः या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. जेईई-मेन परीक्षेत मिळालेले गुणसुद्धा ग्राह्य धरले जातात. जेईई-मेन परीक्षा दिलेले जे उमेदवार या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, त्यांची गुणवत्ता यादी संस्थेमार्फत तयार केली जाते. त्यावर आधारित जागांच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जातो.

 नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम ः
संस्थेच्या स्कूल ऑफ लॉमार्फत, बी.टेक. ऑनर्स इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) सायबर लॉ (२) इंटेलेक्युचअल प्रॉपर्टी राईट्स हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमाला इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे प्रवेश दिला जातो. 
पात्रता ः दहावी आणि बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. या अभ्यासक्रमांचा कालावधी सहा वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये सायबर विश्वाशी निगडित विविध कायदेशीर बाबी आणि संगणक शास्त्राचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
संपर्क ः (१) एनर्जी एकर्स कॅम्पस - पोस्ट ऑफिस बिधोली व्हाया प्रेम नगर, डेहराडून-२४८००७, (२) नॉलेज एकर्स कॅम्पस - पोस्ट ऑफिस कांधोली व्हाया प्रेमनगर, डेहराडून-२४८००७, दूरध्वनी - ०१३५-२७७०१३७ , २७७६०५४, फॅक्स-२७७६०९५ , 
संकेतस्थळ ः upes.ac.in, 
ईमेल ः enrollments@upes.ac.in

हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स
या संस्थेला २००८ मध्ये विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर या संस्थेने आधुनिक काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम आणि पारंपरिक ज्ञानशाखेत स्पेशलायझेशन सुरू केले आहेत. 

संस्थेचे अभ्यासक्रम ः 
 बी.टेक. इन कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन (१) आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशिन लर्निंग, (२) डेटा सायन्स, (३) इंटरनेट ऑफ थिंग्ज, (४) क्लाऊड कॉम्प्युटिंग अँड व्हर्च्युअलायझेशन. बी.टेक. इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विथ स्पेशलायझेशन इन (५) सायबर सिक्युरिटी, (६) क्लाऊड कॉम्प्युटिंग.

 मेकॅनिकल - (१) ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या शाखेत ऑटोट्रॉनिक्स, मोटोरस्पोर्ट इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल व्हेइकल अँड मोबिलिटी या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (२) मेकॅट्रॉनिक्स या शाखेत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (३) मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेत इंजिनिअरिंग डिझाइन आणि ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (४) एरोनॉटिकल इंजिनिअरिंग या शाखेत एअरक्राफ्ट स्ट्रक्चर, एरोडायनामिक्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स आणि एव्हिऑनिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (५) एरोस्पेस इंजिनिअरिंग या शाखेत प्रोप्युलशन आणि कॉम्प्युटेशनल फ्ल्युइड डायनॅमिक्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. (६) सिव्हिल इंजिनिअरिंग या शाखेत स्ट्रक्चरल आणि कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

 इतर अभ्यासक्रम - बी.टेक. इन (१) इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग शाखेत डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयामध्ये स्पेशलायझेशन करता येते. (२) इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेत रिन्युएबल एनर्जी सिस्टिम्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज अँड एम्बेडेड सिस्टिम्स या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते.

एंट्रन्स एक्झामिनेशन - संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हिंदुस्थान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झामिनेशन, ही ऑनलाइन एंट्रन्स परीक्षा घेतली जाते. 
संपर्क ः १, राजीव गांधी सलाय, पदूर, व्हाया केलाम्बक्कम, चेन्नई - ६०३१०३, दूरध्वनी ः ०४४-२७४७४२६२, फॅक्स ः २७४७४२०८,
संकेतस्थळ ः hindustanuniv.ac.in, 
ईमेल ः info@hindustanuniv.ac.in

संबंधित बातम्या