मेकअप टिप्स आणि प्रॉडक्ट केअर

स्वप्ना साने
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पाऊस विशेष

अनलॉक प्रोसेस सुरू झाली आणि हळूहळू सर्वांची दिनचर्या पूर्ववत होऊ लागली आहे. ऑफिस सुरू झाल्यामुळे वर्किंग वूमेनची धावपळ परत सुरू झाली आहे. इतके दिवस वर्क फ्रॉम होम होते, त्यामुळे जरा निवांत होते. पण आता परत प्रवास, ट्रॅफिक आणि कॉर्पोरेट वर्ल्डचे रुटीन सुरू आणि त्यात पाऊस! 

अशा या घाईगडबडीत, दिवसभर फ्रेश कसे दिसायचे आणि पाऊस असला, तरी मेकअप कसा टिकवून ठेवायचा, हे आज आपण बघूया.

पावसाळ्यात हवेत आर्द्रता जास्त असते, त्यामुळे त्वचा स्टिकी फील होते. अशा वेळी कुठलेही प्रॉडक्ट वापरणे योग्य नाही. या दिवसांत लाइट मेकअप प्रॉडक्ट्स वापरावेत. मेकअपसाठी या काही टिप्स-

  • त्वचा कुठल्याही प्रकारची असो, ऑइल फ्री मॉईश्‍चरायझर वापरावे. त्यानंतरच लाइट फाउंडेशन किंवा टिन्टेड सन स्क्रीन लावावे. खूप जास्त मेकअप नको असेल, तर मॉईश्‍चरायझरमध्ये थोडे BB क्रीम मिक्स आणि ब्लेंड करून चेहऱ्यावर एकसारखे लावावे. 
  • कॉम्पॅक्ट पावडर जरूर लावावी, म्हणजे घाम येणार नाही आणि मॅट लुक दिसेल.  
  • डोळ्यांच्या मेकअपसाठी जेल आय लायनर आणि काजळ बेस्ट आहे. अगदी लाइट आणि स्मज प्रूफ असे हे प्रॉडक्ट, सहज कॅरी करता येते आणि लावायलाही अगदी सोपे आहे.
  • लिप लायनर्स आणि मॅट लिपस्टिक ही प्रॉडक्ट्स पावसाळ्यात फार महत्त्वाची आहेत. सिंपल मेकअप लुकसाठी लिप लायनर वापरून लिप बाम लावावे. त्यावर मॅट लिपस्टिकने फिलिंग केल्यावर खूप छान मॉइस्ट लुक दिसतो. लिप्स हायड्रेटेड राहतात आणि कलर स्मज होत नाही. सॉफ्ट ब्राउन किंवा पिंक शेड नॅचरल लुक देतात. 
  • ब्लशर आणि आयशॅडोसुद्धा नॅचरल कलरमध्ये निवडावेत. पावडर बेस्ड प्रॉडक्ट वापरावे किंवा वॉटरप्रूफ बेक केलेले प्रॉडक्ट्स जास्त छान इफेक्ट देतात. पेस्टल आणि बेज कलर या सीझनमध्ये खुलून दिसतात. 

कमीतकमी मेकअप करून आपले फेशियल फीचर्स एनहान्स करायचे असतात. त्यामुळे कमीतकमी प्रॉडक्ट वापरून आणि आवश्यक तेवढाच मेकअप केला, तर चेहरा खरेच खुलून दिसतो. खूप भडक मेकअप हा आर्टिफिशअल दिसतो. त्यामुळे नेहमी नॅचरल मेकअप करावा. 
मेकअप लुक पूर्ण होतो तो योग्य ती हेअर स्टाइल करून. लांब केस असतील तर हाय पोनी किंवा टॉप नॉट परफेक्ट कॉर्पोरेट लुक देतो. केस शॉर्ट असतील तर ब्लो ड्राय करून केस व्यवस्थित सेट करावेत. नखांना शेप देऊन नेल पॉलिश लावावे, पण सोबर कलरचा वापर करावा. 
महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही कोणता ड्रेस घालताय यावर पण तुमचा मेकअप आणि हेअर स्टाइल अवलंबून असते.   

प्रॉडक्ट केअर

  • पावसाळ्यात खूप लवकर इन्फेक्शन होऊ शकते, त्यामुळे आपले मेकअप प्रॉडक्ट्स काळजीपूर्वक वापरावेत. जुने आणि एक्सपायरी डेट उलटून गेलेले प्रॉडक्ट्स वापरू नयेत.
  • हात स्वच्छ धुऊन कोरडे करून मग प्रॉडक्ट हातावर घ्यावे. ओल्या हाताने घेऊ नये. पाण्यामुळे बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकते. 
  • मेकअप ब्रश वापरताना सॅनिटाइझ केलेला वापरावा. इतर कोणाचे प्रॉडक्ट्स आणि ब्रशेस वापरू नयेत. इन्फेक्शन होऊ शकते. तसेच लिप लायनर, आय लायनर हेसुद्धा स्वतःचे वापरावे. 
  • मेकअप ब्रशेस सॉफ्ट सोपने धुवावेत आणि नीट पुसून ड्राय करून ठेवावेत.
  • हल्ली मॉईश्‍चरायझरही डिस्पेनसिंग बॉटलमध्ये येतात, त्यामुळे असेच प्रॉडक्ट वापरावे, म्हणजे जंतूसंसर्ग होत नाही. 

मेकअप कुठल्याही ऋतूमध्ये असो, तो रिमुव्ह करणे आवश्यक आहे. मेकअप रिमुव्हर्स बरेच मिळतात, हल्ली टिशू वाइपही मिळतात, जे ऑफिसमध्ये किंवा प्रवासात सहज कॅरी करता येतात. मेकअप रिमुव्ह केल्यावर त्वचा मॉईश्‍चराइझ करायला विसरू नका.

संबंधित बातम्या