शब्दकोडे ५९
शब्दकोडे ५९
शब्दकोडे ५९
आडवे शब्द
१. तळहातावरच्या रेषांवरून भविष्य पाहण्याचा प्रकार,
५. प्रतापशील, पराक्रमी,
७. मोराचा आवाज,
८. विवाहातील लाह्यांची आहुती देण्याचा एक विधी,
९. कणीक वगैरे मळण्याचे पसरट पात्र,
११. आश्चर्य वाटल्यावर तोंडाचा आकार आणि पाणी पिण्याच्या या पात्रासारखा करतात,
१३. धूळ किंवा फुलातील कण,
१५. वृक्ष, झाड,
१७. हा बांधणे म्हणजे प्रतिज्ञा, निर्धार,
१८. सुहास्यवदन, आनंदी,
२०. पोटात पाणी होण्याचा एक विकार,
२१. जमिनीवरील फरशी किंवा ही पावाचीही असते.
२२. कुंभाराची भट्टी किंवा ओल्या भाताचा गोळा,
२३. आवाज, ध्वनी,
२५. अंधार, काळोख,
२८. बारीक बुडबुड्यांचा हा समूह साबणाला आला नाही तर तोंडाला येतो,
२९. फार रुंद,
३१. प्रमाणपत्र,
३२. एखाद्या हक्कापासून दुरावलेला,
३३. फाट्याला रबर लावून केलेले दगड मारण्याचे साधन,
३४. रेशीम किड्यांचे पोषण करणारे फळझाड,
३५. मदिरा किंवा पश्चिमेकडील वारा,
३६. योगी, तपस्वी.
उभे शब्द
१. स्वतः किंवा दुसऱ्याकरवी,
२. अयोध्यानगरी,
३. बोलू न शकणारा, वाचा गेलेला,
४. सजावटीचे चंदेरी तंतू,
५. समुद्राचे पाणी मागे हटण्याची स्थिती,
६. बस्तान, स्थिरस्थावरता,
१०. सुकुमार, सुंदर,
१२. जहाजाचा नांगर,
१४. चांदणे किंवा व्याकरण ग्रंथ,
१६. सव्यक्षता, ताडून पाहणे,
१७. सुगंधी लाकूड,
१९. जलाशय, सरोवर,
२३. ओघवती वाणी,
२४. बंधू, भाऊ,
२६. मादक तरुणी,
२७. निस्संशय,
२९. आदेश, हुकूम,
३०. चटका देण्याची सळई.