शब्दकोडे ६०

किशोर देवधर
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

शब्दकोडे 
 

आडवे शब्द
१.     पैदास, उत्पन्न,
३.     शंका, संशय,
६.     कोल्हापुरी मिरचीची जात,
७.     पुढल्या बाजुपेक्षा मागील अरुंद असलेला भूखंड, हा लाभत नाही म्हणतात.
८.     सरकारी मुख्यत्यारपत्र,
१०.     मनातील इच्छा पूर्ण व्हावी म्हणून काही करण्याची देवापुढे केलेली प्रतिज्ञा,
१३.     धूसर, अस्पष्ट,
१४.     खानेसुमारी, शिरगणती,
१७.     रक्तवाहिनी, नस,
१८.     ढीग, रास,
२०.     मूस, ठसा,
२२.     असूया, मत्सर,
२४.     विक्री किंवा बाजारातील मागणी,
२५.     चमक, मुरगळ,
२७.     पगडा, वर्चस्व,
३०.     चित्रपटाची कहाणी
३२.    नवीन कामाचा मुहूर्त किंवा निश्‍चय,
३४.     टवटवी,
३५.     हरणाची एक जात,

उभे शब्द
१.     बाहेर जाण्याचा मार्ग,
२.     पावसाळी ढग किंवा वेगाने,
३.     बंदुकीच्या पुढील बाजूला लावलेले पाते,
४.     सोस, प्रबळ इच्छा,
५.     पाण्याच्या दोन मोठ्या भागांना जोडणारा पाण्याचा पट्टा,
९.     या प्रारंभाला घडाभर तेल लागते,
११.     बेण्याचा घोडा किंवा देवाच्या नावाने सोडलेला बैल,
१२.     दुय्यम, कमी महत्त्वाचे,
१३.     नशा आणणारे, मादक,
१४.     संगीताची मैफल,
१५.     खूप खोल खड्डा,
१६.     नावाडी, होडी वल्हवणारा,
१९.     तीन बाजूला पाणी आणि एका बाजूने जमीनीने वेढलेला प्रदेश,
२१.     रूढी, रिवाज,
२२.     हट्टी, दुराग्रही,
२३.     मोकळीक, स्वातंत्र्य,
२६.     सौदामिनी, आकाशात चमकणारी वीज,
२७.     पद्धत, पायंडा,
२८.     ऋतुंचा राजा, 
२९.     कापडाची ही अरुंद पट्टी कापून उद्घाटन करतात, 
३१.     सुळका, डोंगरांचे टोक,
३३.     किल्ली किंवा वेदनेची चमक.

फोटो फीचर

संबंधित बातम्या