शब्दकोडे ६१
आडवे शब्द
१. लढाऊ जहाजांचा काफिला, नौदल,
३. श्रद्धेबरोबर हा संयमदेखील हवा,
६. गुऱ्हाळातील मोठी कढई,
७. बुरखा, चेहऱ्यावरील पडदा,
८. युद्धातील धुमश्चक्री,
९. साताऱ्याला जाताना हरवणारा कर्णभूषणाचा प्रकार,
१०. पाणी किंवा वारा,
१२. अपराध,
१३. हिम्मत, अवसान,
१५. वधूने पांघरण्याचे उंची वस्त्र,
१६. आजन्म, मरेपर्यंत,
१९. ओतीव लोखंड,
२१. निष्ठावंत उपासक,
२२. नाश, उतरती कळा,
२५. बालिश,
आडवे शब्द
१. लढाऊ जहाजांचा काफिला, नौदल,
३. श्रद्धेबरोबर हा संयमदेखील हवा,
६. गुऱ्हाळातील मोठी कढई,
७. बुरखा, चेहऱ्यावरील पडदा,
८. युद्धातील धुमश्चक्री,
९. साताऱ्याला जाताना हरवणारा कर्णभूषणाचा प्रकार,
१०. पाणी किंवा वारा,
१२. अपराध,
१३. हिम्मत, अवसान,
१५. वधूने पांघरण्याचे उंची वस्त्र,
१६. आजन्म, मरेपर्यंत,
१९. ओतीव लोखंड,
२१. निष्ठावंत उपासक,
२२. नाश, उतरती कळा,
२५. बालिश,
२६. किंमत, गुण किंवा योग्यता,
२८. कुऱ्हाड किंवा जमिनीवरील लादी,
३०. चिकट किंवा कण्या न पडलेले तूप,
३१. छक्केपंजे माहीत नसलेला.
उभे शब्द
१. वर्तनाची नियमावली, ही निवडणूकीपुरतीच असते,
२. संगीतातील एक राग,
३. स्वाक्षरी, हस्ताक्षर,
४. एक अतिशय बोलका पक्षी,
५. मुलाची पत्नी, सून,
६. घासण्याचे हत्यार,
७. गुण्यागोविंदाने, स्नेहभावाने,
११. सहजतेने, सफाईदारपणे,
१४. खोल पाणी असलेला नदीच्या पात्राचा भाग,
१६. कडीपाट, लाकडी फळ्यांचे छत,
१७. धुमश्चक्री, मोठा गदारोळ,
१८. पद्धत, प्रकार,
२०. हा मारणे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य लंपास करणे,
२३. चिता, प्रेत दहनासाठी रचलेली लाकडे,
२४. हे बाष्प तोंडाचे दवडू नये,
२७. विनंती, मागणे,
२९. तंतू,
३०. शरीरातील चरबी.