शब्दकोडे : ६३

किशोर देवधर
शनिवार, 12 मे 2018

शब्दकोडे

आडवे शब्द
१.     शोभिवंत, सुंदर,
४.     उद्विग्न, मन दुभंगलेला,
६.    उपकाराची जाणीव न ठेवणारा,
७.     काठी, किंवा स्टंप
८.     अल्प, मोजका,
९.     जुळणी, एकत्रित करणे,
१२.    वेडे चाळे, लोक नावे ठेवतील असे वागणे,
१३.    चाबूक किंवा सदस्यांना सभागृहात हजर राहण्याचा आदेश देणारा पक्षाचा पदाधिकारी,
१४.     विष्णूची पत्नी, लक्ष्मी,
१६.     हिंदूंचा पवित्र ग्रंथ,
१८.     शरीराचे अवयव,
१९.     घागर, पाणी भरण्याचे पात्र,
२०.     वळलेली दोरी,
२१.     पुसण्याचे फडके,
२२.     शेतात वाढणारे निरुपयोगी गवत,
२३.     खुबी, रहस्य,
२५.     बरोबर लागू पडणारे किंवा सोंगट्यांच्या खेळातील हार,
२८.     सौरभ, सुगंधी तंतू,
३०.     प्रज्वलित, तापलेले किंवा भरपूर गराने युक्त,
३३.     बाजार,
३४.     गुणधर्म,
३५.     समईचे तेल घालण्याचे तोंड

उभे शब्द
१.     आश्‍चर्य वाटण्याजोगे, अद्‌भुत,
२.     पगाराव्यतिरिक्त इतर खर्चासाठी मिळणारे पैसे किंवा सुकी भेळ,
३.     पोटात उजव्या बाजूला असलेली पिशवी, पित्ताशय,
४.     दुसऱ्याच्या कामात अडथळे आणण्यात आनंद मानणारा,
५.     मुंगूस किंवा पाच पांडवांपैकी चौथा,
८.     फेपरे, फीट येण्याचा विकार,
१०.    शरीरयष्टी किंवा मुकटा,
११.    क्रांतिवृत्ताच्या सत्तावीस भागांपैकी प्रत्येक यासारखे रूप असावे पण हे हातावर मात्र पडू नये,
१५.     खडकाळ जमीन,
१७.     सावकाराकडे हमी म्हणून ठेवलेली वस्तू,
१८.     मंडईतील दुकान,
२१.     गाठोडे,
२२.     पोट फुगून लागलेली कळ,
२४.     पोत्याचा तुकडा,
२५.     फुंकून वाजवण्याचे तुतारीसारखे पण लहान आकाराचे वाद्य,
२६.     प्रवेशद्वारावर लावलेली माळ,
२७.     डोक्‍याने केलेला जोराचा आघात,
२९.     गोड पाणी असलेला कोवळा नारळ,
३१.     टोला, आघात,
३२.     बुरूज किंवा किनारा

फोटो फीचर

संबंधित बातम्या