शब्दकोडे : ६२

किशोर देवधर
शनिवार, 12 मे 2018

शब्दकोडे

आडवे शब्द
१.     शिक्षणाचा श्रीगणेशा करताना प्रथम गिरविण्याची चार अक्षरे,
४.     पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील चोपदार किंवा मोठ्या खोकल्याचा प्रकार,
६.     अस्थिर, दोलायमान,
८.     तऱ्हेवाईक, विचित्र,
९.     एकदम ब्रेक दाबल्याने बसणारा जोराचा धक्का,
११.     कृद्ध, रागावलेला,
१२.     हा पाहून पाठ फिरवावी,
१३.     एक भाषालंकार,
१६.     चपटा गोल तुकडा,
१८.     साधे जेवण किंवा नवऱ्यापेक्षा बायको वयाने जास्त असलेले जोडपे,
२१.     दुर्मिळ, क्वचित आढळणारा, सुटासुटा,
२२.     बिघडण्याची स्थिती, घोटाळा,
२३.     काढून टाकलेला, वगळलेला,
२५.     हा सापडला म्हणून कुणी घोडा आणत नाही,
२८.     सुंदर घरटे विणणारा एक पक्षी
२९.     पुरेसा, आवश्‍यक तेवढा,
३०.     या पुणेरी शिरोभूषणासाठी सर सलामत पाहिजे,
३१.     गळू पिकण्यासाठी हे त्यावर बांधतात,
३२.     या लाख केल्या तरी चालतील, पण ही पालेभाजी आळूच्या भाजीत घालण्याची एक करून चालत नाही,
३३.     जनावरांचा समूह,
३४.     पोते, मोठी पिशवी,
३५.     भिकेची बहीण, संकोच

उभे शब्द
१.     बभ्रा, गाजावाजा,
२.     हा आगीचा किंवा रागाचा उडतो,
३.     जिन्नस, वस्तू किंवा पर्वत,
४.     केळीचे सबंध पान,
५.     त्रोटक, थोडक्‍यात,
७.     जखमेवर लावण्याचे औषध,
८.     वाटप,
१०.     सजीव व निर्जीव सर्व सृष्टी,
१३.     संन्यासी, विरक्त,
१४.     जाड, कडक आवरण,
१५.     बारीक मण्यांची माळ किंवा कापडाचे टेक्‍श्चर,
१७.     वेळू, बांबू,
१९.     वृत्तपत्रातील स्तंभ,
२०.     पत्नी, बायको,
२१.     उपहास,
२२.     गैरसमज, चुकीचा उलटा अर्थ,
२४.     नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा,
२६.     फेकून मारलेला ओल्या पदार्थाचा गोळा,
२७.     सोडचिठ्ठी, घटस्फोट,
३१.     गावाच्या, देवाच्या नावाने सोडलेला बैल,
३२.     वस्त्राची दुमड, घडी
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या