शब्दकोडे ६४

किशोर देवधर
शुक्रवार, 18 मे 2018

शब्दकोडे
 

आडवे शब्द
१. निष्कारण देण्यात येणारे दूषण,
५. वर निमुळता वाढत जाणारा एक शोभेचा वृक्ष,
७. युक्तिवाद, सारवासारव,
९. प्राप्ती किंवा मालमत्ता,
१०. अवनी, पृथ्वी,
११. घुसळण्याचे साधन,
१२. वचन, आश्‍वासन,
१३. छद्मी भाषण, उपरोधिक बोलणे,
१४. बारा वर्षांचा काळ,
१७. दूरवरून बारकाईने केलेली पाहणी,
१९. सोय, व्यवस्था,
२२. सफलता,
२५. दुखणेकरी, पेशंट,
२६. दूध नासून हे झाले तर चांगलेच, पण कष्टाचे व्हायलाच पाहिजे,
२८. झाडांना पाणी घालण्याचे विशिष्ट आकाराचे पात्र,
३०. ज्याला खरकट्याचा स्पर्श नाही असे किंवा असा भांड्यात पदार्थ करपत नाही,
३१. असे संबंध म्हणजे वडाची साल पिंपळाला लावणे,
३२. धागा, दोरा,
३३. तबल्याचा जोडीदार

उभे शब्द
१.     सपक, बेचव,
२.     लहान मुलांच्या पंखवाल्या सुंदरीच्या कहाण्या, ------ टेल्स,
३.     हा धरला तर धीर, भरला तर धमकी,
४.     आधार, सांत्वन,
६.     दोन मोठे भोपळे असलेले दत्तात्रेय पार्वतीकर, हिंदराज दिवेकर यांनी लोकप्रिय केलेले तंतुवाद्य, उत्तर भारतात याला बीन असे संबोधले जाते,
८.     जेवण झाल्यावर ताटात राहिलेले, खाली सांडलेले अन्नाचे कण,
११.     मनोहर, सुंदर,
१३.     मोठा नाकतोडा,
१५.     बाजारातील इभ्रत,
१६.     आगामी, पुढे होणारा,
१८.     विमानात प्रवाशांची देखभाल करणारी,
२०.     एक धातू, 
२१.     गरज, आवश्‍यकता,
२३.     आयुध, हत्यार
२४.     चर्मकार, 
२७.     वीज निर्माण करणारे यंत्र,
२८.     डोळ्यावर आलेली झोपेची गुंगी,
२९.     अग्नीने दशरथाला दिलेली खीर
 

फोटो फीचर

संबंधित बातम्या