शब्दकोडे

किशोर देवधर
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

आडवे शब्द

आडवे शब्द

१.     संगीतातील पहिला स्वर, 
३.     वरच्या मजल्यावरची पडवी, गॅलरी, 
४.     देवाचे अस्तित्व मानणारा,
६.     नाकात होणारी पुटकुळी,
७.     देवीचा उपासक,
८.     मुंगूस किंवा पांडवांपैकी चौथा,
९.    मकबरा, थडगे,
१२.     बुरखा, चेहऱ्यावरील पडदा,
१३.     उथळ पाण्याचा आवाज,
१६.     तोकडा, अपुरा,
१७.     धातूच्या पात्राचे भोक दुसऱ्या धातूचा डाग देऊन बुजवण्याची क्रिया,
१८.     पहिलवान, कुस्तीगीर,
१९.     उंटांचा समूह,
२०.     भिजवून मळलेला पदार्थाचा गोळा,
२२.     विद्येची देवता, सरस्वती,
२४.     चुणूक, थोडा नमुना,
२५.     जाणकार, माहीतगार,
२६.     एक औषधी मुळी, सर्दीपासून बचाव करण्यासाठी याची पावडर बाळांना लावतात, इंग्रजीत कॅलॅमस रूट,
२७.     ऐकू न येणारा,
२९. लकडा, मागणीचा आग्रह,
३१. दृष्ट लागू नये म्हणून लहान मुलाला लावलेला काजळाचा ठिपका,
३४.     जख्खड म्हातारा,
३५. धातूवर नक्षीकाम करणारा

उभे शब्द
१.     कार्तिकस्वामी, गणपतीचा भाऊ,
२.     एक अतिशय तीव्र रेचक,
३.     हुक्की, लहर, तिडीक,
४.     वडिलांची बहीण,
५.     तांदळाचे तुकडे,
७.     मोहिनी,
१०.     पडक्‍या घराची मोकळी जागा,
११.     बैलांचा सण,
१४.     चमचमीत, मसालेदार,
१५.     डोक्‍यावर मारलेली हलकी चापट,
१६.     चंचल, उथळ,
१७.     कसून तपासणी किंवा डॉ. विश्‍वास पाटील यांची एक कादंबरी,
१८.     डागडुजी किंवा शेतीची कामे,
२०.     विशिष्ट शैली, अदा,
२१.     पात्राच्या तोंडावर आवळून बांधलेले वस्त्र,
२३.     हक्क, अधिकार सांगणारा किंवा खटला भरणारा,
२८.     ओंगळ, किळसवाणे,
३०.     समुद्राच्या लाटांचा आवाज,
३२.     एक हजार किलोचे वजन,
३३.     स्मश्रू, तीर्थस्थानी केलेले मुंडण

फोटो फीचर

संबंधित बातम्या