शब्दकोडे क्र. ६१

किशोर देवधर
सोमवार, 13 जुलै 2020

शब्दकोडे क्र. ६१

आडवे शब्द
१.    म्हणजे लाक्षणिक अर्थाने बराच काळ निघून जाणे, 
६.     आडदांड, रांगडा, 
८.     वैरी, शत्रू, 
९.     मेंदी, 
१०. एक औषधी वनस्पती जिला अमृतवेल असे संबोधले जाते, 
१३. फाट्याला रबर बसवून केलेले दगड मारण्याचे साधन, 
१४. असा विचार म्हणजे विवेक, 
१६. पसरलेला सुवास, 
१७. रेचक किंवा मोत्याचे तेज, 
१८. सुक्या मेव्यातील एक काजूसारखा प्रकार ज्याला निकोटक असेही म्हणतात, 
१९. सरकारी मान्यतापत्र, 
२३. गुणांची किंमत करणारा, 
२६. नष्ट, पराभूत, 
२७. काहीही धाड न भरलेला, सुदृढ.

उभे शब्द
१.     फुलाच्या आकाराचा कमळे असलेला हौद, 
२.     समुद्राच्या भरतीचे पाणी जेथवर जाते तेथवरचा नदीचा भाग,
३.     नटूनसजून गावभर हिंडणारा, 
४.     वाघ्याचा हा अश्वशाळेचा अधिकारी झाला तरी त्याचा येळकोट जात नाही, 
५.     जन्माच्यावेळी डोक्यावर असलेले केस किंवा ते काढण्याचा विधी,
७.     मिरवणुकीतल्या बैलाच्या अंगावर पांघरण्याची भरजरी चादर, 
१०.    गंजिफाच्या खेळातील एक संज्ञा किंवा प्रश्न यात ठेवून टाळतात, 
११.     वसुंधरा, पृथ्वी, 
१२.     शेंडीभोवती ठेवलेले केसांचे वर्तुळ, 
१४.     टरफलासहित तांदूळ, 
१५.     म्हणजे लाक्षणिक अर्थाने गोड गोड बोलणे, 
१७.     कोरड्या खोकल्याची उबळ, 
१८.     शिवधनुष्य, 
२०.     अनिर्बंध, मुक्त, 
२१.     बाह्यरूप, विटेवर उभे असेल तर मात्र सुंदर, 
२२.     उन्हाळ्यात त्वचेवर येणारे लालसर पुरळ, 
२४.     डोंगराची तुटलेली बाजू, 
२५.     जाळणारे, आग आग करणारे.

संबंधित बातम्या