शब्दकोडे क्र. ६३

किशाेर देवधर
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

शब्दकोडे

आडवे शब्द :
१. योगायोग, सहजगत्या जुळून आलेली गोष्ट,
६. भेदभाव, एकाला झुकते माप देणे,
७. अंथरुणाची गुंडाळी,
८. मक्ता, कंत्राट, 
९. खेळात निवाडा करणारा,
१०. प्रगती अधोगती दाखवणारे रेखाचित्र,
११. हा आघात भाऊचा असेल तर मुंबईतील पूर्वीचे कोकणात जाणाऱ्या बोटी लागण्याचे ठिकाण,
१२. कुबड, पाठीत आलेला बाक,
१४. उदोउदो, डोक्यावर घेऊन नाचणे,
१८. झेंडा, निशाण,
१९. अराजक, अंदाधुंदी,
२१. साधा, प्रामाणिक,
२२. पाण्यात उगवणाऱ्या एका वनस्पतीचे उपवासाला चालणारे फळ,
२३. वस्तू विकण्याचे ठिकाण, 
२४. कमळाचे देठ,
२६. योगी, तपस्वी,
२७. कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज किंवा मशिदीतून केलेला पुकारा

उभे शब्द :
१. एखाद्यापुढे तोंड उघडून भाष्य करण्याची हिंमत देणारा,
२. किरकोळ, सटरफटर,
३. कुस्तीत जमिनीला पाठ लागणे,
४. दोषारोप,
५. मानगुटीवर भूत बसलेला, 
८. अडखळून पायाच्या बोटाला होणारी जखम, 
९. चिखलात उगवणारे फुल, कमळ,
१२. बागकामासाठी वापरली जाणारी माती,
१३. नौबत, नगारा, 
१४. सातुसारखे एक धान्य,
१५. कर्नाटकातील लोककलेचा एक प्रकार ज्यावरून मराठीत संगीत नाटकाचा उदय झाला,
१६. किंमत, गुण किंवा योग्यता,
१७. घुसळण्याचे साधन, पानव,
१८. अगदी लहान मुलालाही समजेल इतके सोपे,
२०. एक सुगंधी वनस्पती, 
२२. मडकी टांगून ठेवण्याचे दोरीचे साधन,
२४. हरणाचे नक्षत्र,
२५. वशिला, संधान

संबंधित बातम्या