शब्दकोडे ६४

किशोर देवधर
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

शब्दकोडे ६४

आडवे शब्द :
१. कंबरदुखीची पीडा, अवघड जागी दुखणे,
६. दिनचर्या, दैनंदिनी,
७. सध्या, तूर्त,
९. कुलूप,
११. शोक, दु:ख, 
१३.पूर्वीचे चार शेरांचे वजन,
१५. युद्ध, लढाई,
१७. बाजू किंवा किनार,
१८. हा सापडला म्हणून कुणी घोडा आणत नाही,
१९. पाककलेत कुशल किंवा सुंदर घरटे विणणारा एक पक्षी,
२०. अत्तराचा बोळा,
२१. श्राद्धाचा एक प्रकार किंवा पितृपक्षाला या नावाने संबोधले जाते,
२२. धाक, जरब,
२४. देवाचा निर्णय किंवा छतावरील मातीचे पन्हळ,
२६. उन्हाची किंवा थंडीची तीव्रता,
२९. कामगारांवर देखरेख ठेवणारा,
३०. वरिष्ठांना दिलेल्या भेटवस्तू,
३१. नकली दंतपंक्ती 

उभे शब्द :
१. खटला किंवा भांडण,
२. संसदेतील प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर आणि मुख्य कामकाज सुरू होण्यादरम्यानचा गदारोळ होण्याचा काळ,
३. रंगीत नक्षीचे कापड, 
४. अपघातानंतर साचलेले रक्त किंवा मोटेचे साचलेले पाणी,
५. देवाणघेवाण, रुपये देऊन त्याबदल्यात डॉलर्स घेण्यासारखा व्यवहार,
८. बूड, खालचा भाग किंवा छावणी,
९. भजनाला साथ देणारी लहान झांज,
१०. चव कळणारे इंद्रिय, जीभ,
१२. कानाडोळा, दुर्लक्ष, 
१३. झाडावर पिकलेला आंबा,
१४. सहजतेने, सफाईदारपणे,
१६. ढाक्याचे प्रसिद्ध तलम कापड,
१७. अनुकंपा, सहानुभूती,
१९. सोपे, सहज होण्यासारखे,
२०. ऐटबाज, सुंदर,
२३. ठिणगी किंवा छोटी लढाई,
२४. लंगोटी, 
२५. जहाजाला दिशा देणारे उपकरण,
२७. सोनाराचा भट्टीतील मूस उचलण्याचा चिमटा किंवा एक वनस्पती, 
२८. काकडीची मोठ्या आकाराची जात

संबंधित बातम्या