शब्दकोडे ६५

किशोर देवधर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

शब्दकोडे ६५

शब्दकोडे ६५

आडवे शब्द :
१. लोकांना हे सांगणारे स्वतः मात्र कोरडे पाषाण असतात,
४. अवघड, गुंतागुंतीची वेळ, 
७. कमळ किंवा मोती,
९. बैल, शंकराचे वाहन,
१०. लेखणी किंवा घटनेतील भाग, 
१२. नुकतेच जन्मलेले मूल,
१५. छक्केपंजे माहीत नसलेला पण असे दाखवणारेच जास्त,
१६. चटोर, फाजील,
१७. दीन, निरुपाय,
१९. शैली, धाटणी, 
२०. ज्वालामुखीतून बाहेर पडणारा रस,
२२. शिशू, लहान मूल,
२४. उग्र वास,
२५. काकुळतीची विनंती, पदर पसरणे, 
२७. नोंद, 
३१. चर्मकार,
३२. म्हणजे हाताची घडी तोंडावर बोट 

उभे शब्द :
१. म्हणजे निर्विकल्प समाधी,
२. विद्वान, पंडित,
३. पापी लोकांचे मृत्यूनंतरचे निवासस्थान,
५. नेत्र, डोळे, 
६. मागचा पुढचा संबंध,
८. संगीताची मैफल,
११. भरून आलेले आकाश, ढगाळ हवामान,
१२. आपले देऊन दुसऱ्याचे घेण्याची क्रिया,
१३. जीवनात ही तारेवरची करावी लागते,
१४. रेलचेल, विपुलता,
१८. लहान मुलांचे लोंबते कर्णभूषण,
२१. असे प्रयत्न म्हणजे फोल, निष्फळ,
२२. तबल्याची शाई लावलेली बाजू,
२३. शरीरयष्टी किंवा मुकटा, 
२६. व्रताचे आचरण करणारी,
२८. आपल्याकडील शेतीचा पहिला हंगाम,
२९. लहान मुलांचे इरल्याच्या आकाराचे टोपडे,
३०. मोठी, लांबलचक पिशवी,
३१. एकत्र बांधलेली लाकडे, काटक्या

संबंधित बातम्या