शब्दकोडे क्र. 68

किशोर देवधर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

शब्दकोडे क्र. 68

आडवे शब्द

१.     म्हणजे लाक्षणिक अर्थाने वाईट आईबापाच्या पोटी चांगली संतती जन्माला येणे,
७.     उतरती कळा, नाश,
८.     हिंसक (क्रांती),
९.     जंगल, अरण्य,
११.     दाक्षायणी किंवा दक्षिणेकडचा वारा,
१३.     क्षार, खारट पदार्थ,
१४.     इहलोक आणि यमलोक या दरम्यानची आग ओकणारी काल्पनिक नदी, 
१७.     गंजिफाच्या खेळातील लागलेली पाने किंवा मान्यता,
१८.     निर्ढावलेला, गेंड्याच्या कातडीचा,
१९.     यावेळी, यावर्षी,
२१.     चानी किंवा लोणच्यातील द्राव,
२२.     साध्वी, पतिव्रता,
२३.     गेरू, तांबडी माती,
२४.     महाकाय, जंगी,
२६.     अडगळ ठेवण्याची भिंतीतील पोकळ जागा,
२७.     दोन मोठ्या जलाशयांना जोडणारा पाण्याचा पट्टा,
२८.     चुलीतील विस्तव फुलवण्याची नळी, 
२९.     किल्ल्याभोवतालची सपाट जागा

उभे शब्द
१.     मुद्दल, पुंजी,
२.     पद्धत, प्रकार,
३.     नसनखवडा, माणूसघाणा,
४.     चिता, प्रेत दहनासाठी रचलेली लाकडे,
५.     तरबेज, पटाईत,
६.     रात्री सुवास दरवळवणारे एक फुलझाड किंवा रात्री प्रवास करणारी बस,
१०.     कल्हईसाठी वापरला जाणारा एक खनिज क्षार,
१२.     ही चालत्या गाडीला किंवा कामाला घालतात,
१४.     तुळस,
१५.     स्थगित, रहित,
१६.     मुबलक प्रमाणात वापर करण्याचा सिद्धांत,
१८.     पेटता कोळसा, विस्तव, 
२०.     जे शब्दात सांगता येणार नाही असे,
२२.     एखाद्या गोष्टीचे पूर्ण ज्ञान मिळवलेला, अर्जुनाने धनुर्विद्येत मिळवले होते तसे,
२४.     नावडतीच्या मिठाची चव,
२५.     छपाई,
२६.     खोटे ध्यान करणारा पक्षी, बगळा

संबंधित बातम्या