शब्दकोडे ६९

किशोर देवधर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

शब्दकोडे ६९

आडवे शब्द :
१. यातून निघणे म्हणजे भयंकर दिव्यातून बाहेर पडणे, तीव्र कसोटीला उतरणे,
६. लवण, खारट पदार्थ,
७. नुकताच उगवलेला सूर्य किंवा कोवळे ऊन,
८. वंशातील प्रत्येक पायरी, अशा बेचाळीस पायऱ्यांचा उद्धार करतात,
९. पूजनीय, आदरणीय,
१०. फुंकून वाजवण्याचे तुतारीसारखे पण लहान आकाराचे वाद्य,
११. पाण्याने वेढलेली जमीन,
१२. शरणागती, पाठ दाखवणे,
१४. वृत्तपत्रातील छोटा संपादकीय लेख,
१५. पुसण्याचे फडके,
१६. चटका देण्याची सळई,
१९. हुलगा, या धान्याचे पिठले करतात,
२१. नकली दंतपंक्ती, 
२३. बग्गी, घोडागाडी,
२७. खांबावर आडवी टाकलेली तुळई,
२९. श्रद्धेबरोबर हा संयमदेखील हवा,
३१. मोठ्या प्रमाणावर सुटलेला घाम,
३२. वळलेली दोरी,
३३. ओंगळ, किळसवाणे 

उभे शब्द :
१. तुटपुंजे ज्ञान असलेला हरदास,
२. गर्व, ताठा, 
३. फुलपाखराची एक अवस्था,
४. डोक्यात शिरणारे वेड,
५. मद्य गाळून विकणारा,
७. झुरळ,
१०. जमिनीचे एक परिमाण, साधारणपणे सोळाशे चौरस यार्ड,
११. दंडाच्या किंवा मांडीच्या स्नायूत येणारी गोटी,
१२. माडी, मजला,
१३. गुरांना पाणी पाजण्याचे दगडी पात्र,
१५. घार नसलेले किंवा गेलेले,
१७. खूप खोल खड्डा,
१८. शस्त्रे साफसूफ करणारा,
२०. विहिरीतून पाणी काढण्याचे बैल जुंपलेले साधन,
२२. तमाशातील नाटक,
२४. उन्मत्त, उद्धट,
२५. चामखीळ, तीळ,
२६. असेल हा देव आपला तर देईल खाटल्यावरी,
२८. सर्पाची एक अतिविषारी जात,
३०. साताऱ्याला जाताना हरवणारे कर्णभूषण

संबंधित बातम्या