शब्दकोडे १

किशोर देवधर
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

शब्दकोडे १

आडवे शब्द :
१. सुवासिक पाणी शिंपडण्याचे विशिष्ट आकाराचे पात्र,
४. चार पायांचा प्राणी,
७. सील करण्याचा एक ज्वालाग्राही पदार्थ किंवा एक संख्या,
८. वैर, वाकडे,
९. वक्रता किंवा शाळेतील, बागेतील आसन,
१०. अतिशयोक्तीच्या गोष्टी,
१२. धान्य साठवण्याचे तळघर,
१४. सुज्ञ, जाणणारा,
१७. जत्रेत आढळणाऱ्या तीन प्रकारच्या लोकांपैकी काही सापडतंय का हे पाहायला आलेले,
१९. मोठा खोलगट चमचा किंवा कारस्थान,
२१. पाणी शोषून घेणारा एक मऊ पदार्थ,
२२. फार मोठा फायदा,
२३. हा संगीतातील असेल तर आळवावा नाहीतर आवरावा,
२५. फणसाची एक जात, 
२७. तीन तासांचा काळ, दिवसाचा एक अष्टमांश भाग, 
२८. सुकुमार, सुंदर,
२९. वंचना, फसवणूक,
३१. यंत्राच्या सुट्या भागांना लावण्याचे जळालेले तेल,
३२. माया, वात्सल्य,
३४. उधाण, वसारा,
३५. झाडाची अंतर्साल, रामाने वनवासात जाताना याची वस्त्रे परिधान केली होती,
३६. समुद्राच्या लाटांचा आवाज 

उभे शब्द :
१. या फुलझाडाला कंदीलपुष्प, हनुमान बटाटा किंवा खरतुडी हमण या नावानेही संबोधले जाते, लांब दांड्याची फुले असलेले हे झाड औषधी आहे,
२. ब्याद, नसती पीडा,
३. प्रमाणपत्र,
४. दोनाचे चार हात होणे किंवा हातात बेड्या पडणे,
५. समाधानी, तृप्त,
६. खलाशी, जहाजाचा कप्तान,
११. गळ्याभोवती आवळलेला दोर, पाश,
१३. शस्त्राचा वार किंवा जखम,
१५. वधूवराच्या डोक्यावर टाकण्याचे तांदूळ,
१६. वृष्टी, पखरण किंवा विनापाश, एकटा,
१७. वर्दळ, गर्दी,
१८. वेचक, ठेवणीतला,
२०. विष्णूचा तिसरा अवतार, डुक्कर,
२४. विष, जहर,
२६. ओघवती वाणी, 
२७. वंदन, नमस्कार,
२८. गाढव,
२९. ओंकार,
३०. रेतीवरील रेषा किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या,
३३. कापडाचा गठ्ठा

संबंधित बातम्या