शब्दकोडे २

किशोर देवधर
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

शब्दको़डे

आडवे शब्द :
१. अनेकांनी शत्रूवर तुटून पडून त्याचा सपा उडवणे,
५. झुबका, घोस,
६. कोणतेही हुकूम पाळणारा हाताखालचा खास माणूस, हस्तक,
९. धोतराचा किंवा लुगड्याचा मागे खोचलेला भाग,
१०. नादुरुस्त, दोष निर्माण होणे,
१३. मादक तरुणी,
१४. राजापुढे भाला घेऊन चालणारा,
१५. तमाम, एकूण एक,
१६. गरुडाच्या आईचे नाव,
१७. वाळा, सुगंधी गवत,
१८. हे पेटते लाकूड माकडाच्या हाती देऊ नये,
२०. ज्योतिष्याचा अंदाज,
२१. हिंदोळा, झोपाळा,
२२. या धाग्यावरून स्वर्ग गाठतात,
२५. निबर, खरखरीत,
२७. सध्या, आजकाल, 
२८. लांबलचक कंटाळवाणे भाषण,
२९. शंकराला वाहिले जाणारे त्रिदल,
३०. कपाळावर पडणारी नापसंतीदर्शक रेषा,
३१. आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचा आवाज

उभे शब्द :
१. म्हणजे नसती उठाठेव,
२. काव, तांबडी माती,
३. उतरती कळा, मोडकळीस येणे,
४. चुकचुकून नाट लावणारा प्राणी,
५. भोवऱ्यावर आरीने घाव घालणे किंवा हा गालाचाही घेतात,
७. किल्ला असलेला डोंगर,
८. चोख व्यवस्था,
११. भाव कमी करण्यासाठी घातलेली हुज्जत,
१२. बारा महिने फुलणारे एक झाड, या फुलाला वास नसतो पण ते औषधी गुणांचे भांडार आहे,
१३. वात्सल्य, प्रेम,
१५. सरकारी मुखत्यारपत्र, 
१७. घोड्याला करण्याचा मसाज,
१८. गोंगाट, कल्ला,
१९. दोन बोटांचे माप,
२३. जमिनीची नोंद ठेवणारा सरकारी कर्मचारी,
२४. आपल्या शरीराला नवे रूप देण्याची सिद्धी,
२६. खोकल्याची उबळ पण बाईचा असेल तर मात्र तोरा

संबंधित बातम्या