शब्दकोडे ३
शब्दकोडे ३
आडवे शब्द :
१. म्हणजे लाक्षणिक अर्थाने अगदी अशक्य गोष्ट,
६. अगदी हातपाय पसरून शरणागती,
७. उभट पातेले किंवा लोखंडावर येणारा तांबूस थर,
९. पाठीतील कण्याचे हाड,
११. नियम, ताळतंत्र,
१२. पत्रिकेतील देव, राक्षस व मनुष्य हे प्रकार,
१३. पार्वतीचे एक नाव,
१४. अतिरेक, कमाल,
१९. तेज, चकाकी,
२०. म्हणजे लाक्षणिक अर्थाने अगदी किडकिडीत माणूस,
२२. पूर्वीची ही दोन छोटी वजने म्हणजे नाजूक तब्येतीचे एक विशेषण,
२४. विहिरीच्या दूषित पाण्यामुळे होणारा सध्या बहुतांश निर्मूलन झालेला एक विकार,
२६. कोळिष्टके,
२७. माफ करण्याजोगे,
२८. आंब्याची गावठी जात
उभे शब्द :
१. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुवास,
२. खाण्याची तंबाखू,
३. पदवी स्वीकारणारा, पूर्वी गुरुकुलातील छात्र अंघोळ करून पदवी घ्यायचा त्यामुळे हा शब्द रूढ झाला,
४. डोळ्यावर आलेली झोपेची गुंगी,
५. तुटलेली मने पुन्हा जुळणे, राजकारणात ही कधीही आणि कुणाचीही होऊ शकते,
६. गंध उगाळण्याचा दगड,
८. धाक, वचक,
९. अमली, धुंद करणारे,
१०. छोटी टेकडी, उतरण,
१५. आनंदाने आणि उत्साहाने,
१६. अयोग्य वापर केल्यामुळे, गुधडल्यामुळे होणारी दुर्दशा,
१७. पालन पोषण, सांभाळ,
१८. बापडा, गरीब,
२१. मुष्टिप्रहार, गुद्दा,
२२. शुष्क पदार्थ खाल्याने घशास कोरड पडून गिळण्यास होणारा प्रतिबंध,
२३. अहंकाराचा त्याग, दुसऱ्याचे दुःख पाहून कष्टी होणे,
२५. नीरस,कोरडे