शब्दकोडे ४

किशोर देवधर
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

शब्दकोडे ४

आडवे शब्द : 
१. संकट यायचे असेल तर माणसाची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती होतेच या अर्थाची एक म्हण, 
६. उतरती कळा, नाश, 
८. या फळापासून टुटीफ्रुटी तयार करतात, 
९. उदबत्तीचा चटका, 
११. पदरी पडले की असे पावन, शुद्ध होते, 
१२. मक्ता, कंत्राट किंवा संगीतातील ताल, 
१३. अगदी योग्य, असावे तसे, 
१४. देवयानीचा प्रियकर किंवा हे केस खाऊन माघार घेतात, 
१५. गाढव किंवा घासण्याचा कागद, 
१६. थडगे, कबर, 
१८. पांथस्थ, पथिक, 
२१. मार्ग, रस्ता, 
२३. डौल मिरवणारा, 
२७. बैलांचा सण, 
२८. केळवण, 
२९. युद्धातील तोफवाहू वाहन

उभे शब्द : 
१. कपाळावर लावला तर काळी सुगंधी पूड नाहीतर गुद्दा, 
२. राजीनामा, 
३. अर्जुनाचे एक नाव, 
४. पलाण, घोड्यावरील बैठक, 
५. पद्धत, प्रकार, 
७. पाठिंबा देणारा, 
८. धार्मिक विधीच्यावेळी घालण्याची दर्भाची अंगठी, 
९. या लाख केल्या तरी चालतील पण आळूच्या भाजीत हा घालण्याची एकही करून चालत नाही, 
१०. काकडीचे एक तोंडीलावणे, 
१२. अडखळून पायाच्या बोटांना होणारी जखम, ही पुढच्यास लागली तर मागच्याने शहाणे होणे अपेक्षित असते, १४. कलश, घडा, 
१५. यंत्राचा चाप, उडाला तर खटका, 
१६. बुद्धिहीन, ढ, 
१७. शक्तिशाली, 
१९. लावण्य, सौंदर्य, 
२०. एक भारतीय खेळ, 
२२. कापरे फोडणारे, भीतीदायक, 
२३. मज्जाव, प्रतिबंध, 
२४. कर्ज घेताना हमी म्हणून ठेवलेली वस्तू, 
२५. मसाला वाटण्याचे दगडी साधन किंवा पॅटिसबरोबर खाण्याची उसळ, 
२६. भाजी करण्याची मुळ्याची शेंग, 
२७. परिपक्व, प्रौढ

संबंधित बातम्या