शब्दकोडे ५
शब्दकोडे ५
आडवे शब्द :
१. ब्रह्मा किंवा युरेनस नावाचा ग्रह,
३. सोस, प्रबळ इच्छा,
८. डिप्लोमा,
९. कसेबसे, मोठ्या कष्टाने,
१२. गाढवाला नसलेला गुळाचा स्वाद,
१३. शेपूट घालून पळतानाचे कुत्र्याचे ओरडणे,
१५. निर्जीव शरीर, प्रेत,
१७. अनेक रस्ते मिळण्याची जागा,
१८. मजबूत, भक्कम,
२२. महिरप, धनुष्य,
२४. छक्केपंजे माहीत नसलेला,
२६. लठ्ठ, जाडजूड,
२७. घटकेचा साठावा भाग,
२८. भक्ष्य, शिकार,
३०. शैक्षणिक वर्षाचा एक भाग,
३२. दिवास्वप्न, हवेत इमले उभारणे,
३३. निश्चेष्ट, जागच्या जागी खिळलेला
उभे शब्द :
१. दिवसाचा एक अष्टमांश भाग, तीन तासांचा काळ,
२. कणीक वगैरे मळण्याचे पसरट पात्र,
४. विस्तार किंवा कामाचा पसारा,
५. अनेक मजली इमारतीतील काही खोल्यांचे घर, फ्लॅट,
६. घोड्याचे ओरडणे,
७. शंकराचे नृत्य, थयथयाट,
१०. आयते मिळालेले मोठे द्रव्य,
११. ताडपत्रीवर लिहिण्याची लोखंडी लेखणी किंवा वाईट रस्ता,
१३. आपल्या राष्ट्रीय पक्ष्याचा आवाज,
१४. प्रवासातील भाग किंवा चेंडू पडण्याची जागा,
१५. वेळू, बांबू,
१६. मुख, तोंड,
१७. पनवती, अपशकून,
१९. कर्तृत्ववान, कार्यक्षम,
२०. नदीचे मूळ पाहू नये आणि ऋषीला हे विचारू नये,
२१. मोठ्याने हसणे,
२३. अहंकाराचा वा अभिमानाचा त्याग, दुसऱ्याचे दुःख पाहून कष्टी होणे,
२४. प्रामाणिक, सज्जन,
२५. धान्य पाखडण्याचे हे साधन वाजले की सोहळ्याची सांगता,
२८. उद्दिष्ट, लक्ष्य,
२९. स्थिरस्थावरता, बस्तान,
३१. हैराण, बेजार