शब्दकोडे ७
शब्दकोडे ७
आडवे शब्द :
१. एकाधिकारशाही,
४. गोजिरवाणा, सुंदर,
६. ढाचा, रूपरेषा,
८. लांब साखळी असलेला दीप,
११. उभट पातेले किंवा लोखंडावर येणारा तांबूस थर,
१२. थंड किंवा यावरून भाताची परीक्षा होते,
१३. वासराचे ओरडणे, टाहो फोडणे,
१५. तात्काळ, देवीच्या आरतीतील शब्द,
१६. अंधार, काळोख,
१८. लसणाची पाकळी किंवा दह्याची कवडी,
२०. सीलबंद पाकिट,
२२. विधिपूर्वक स्थापना करणे,
२४. खरेखुरे, जसे आहे तसे,
२५. ग्रहताऱ्यांचा संचारमार्ग,
२६. हौदा, हत्तीवरील डोलारा,
२८. घोड्यावरून मारलेला फेरफटका,
२९. दोन हात करणे, सामना,
३०. या मोठ्या हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही,
३१. स्त्रियांचा तीर मारण्याचा दागिना,
३२. नाक टोचलेला मुलगा
उभे शब्द :
१. युक्तिवाद, सारवासारव,
२. भीषण, भयंकर,
३. पसंती नापसंतीदर्शक उल्लेख,
४. हा शोभेसाठी वस्त्राला लावावा पण कुणापुढे घोळू नये,
५. कमळ,
६. कुंभाराची भट्टी किंवा ओल्या भाताचा गोळा,
७. गुप्त चर्चा,
९. जमिनीकडून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रकार,
१०. याची वेळ म्हणजे तिन्हीसांज,
११. श्रद्धा असेल तर हा स्वतः घालावा पण दुसऱ्याला घालू नये,
१४. रेतीवरील रेषा किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या,
१७. अपुरा, तोकडा,
१८. दुर्दशा, हवा निघून जाण्याची स्थिती,
१९. क्षमा, माफी,
२१. खोटी, रखडपट्टी,
२२. भूगर्भाच्या गाभ्यापर्यंत पोचलेला पृथ्वीच्या तीन थरांपैकी एक,
२३. जाहीर निवेदन, घोषणा,
२६. डोळे उघडवणारे झणझणीत काजळ,
२७. कागद मोजण्याचे एक परिमाण