शब्दकोडे १०

किशोर देवधर
सोमवार, 21 डिसेंबर 2020

शब्दकोडे १०

आडवे शब्द : 
१. आगीतून या धगधगीत राखेत जातात, 
३. दगडी कोळसा तापवल्यावर निघणारा काळा चिकट द्राव, 
६. कुचेष्टा, टिंगल, 
७. वऱ्‍याचे तांदूळ, 
८. सोनाराचा भट्टीतील मूस उचलण्याचा चिमटा किंवा एक वनस्पती, 
९. साध्य, उद्दिष्ट, 
१०. दालन, विभाग, 
११. सूर्याचे तिरपे किरण किंवा त्याची उष्णता, 
१२. छप्पर, 
१३. विक्रीस उपलब्ध असलेले कमी दर्जाचे, 
१५. चरवी, दूध काढण्याचे विशिष्ट आकाराचे पात्र, 
१८. स्तन, छाती, 
१९. दोन अवयव जोडणारा भाग, 
२०. शंकराचे एक नाव किंवा छप्पर फाटलेले घर, 
२२. हा देणे म्हणजे उचलबांगडी, 
२४. डोळे उघडणारे काजळ, 
२५. वैभव, थाटमाट, 
२७. गोष्ट, हकिगत, 
२८. निमित्त, कारण, 
२९. कोळशासारखा आणि भयंकर माणूस, 
३०. कृत्रिम, खोटे, 
३१. विष्णूची पत्नी, लक्ष्मी

उभे शब्द : 
१. ऐन दिवेलागणीची वेळ, कातरवेळ, 
२. झाडाभोवतालचा कट्टा, 
३. केळीचे सबंध पान, 
४. यशस्विता, भाग्य, 
५. म्हणजे जुळी मुले, 
७. सावज, शिकार, 
९. फेकून मारलेला ओल्या पदार्थाचा गोळा, 
१२. पूर्वीच्या शिक्षकांची वेताची काठी, 
१४. नीरस, कोरडे, 
१६. सांभाळ, रक्षण, 
१७. कुलीन, चांगले विचार असलेला, 
२०. आगाशी, गच्ची, 
२१. अबोला, मुक्याचे व्रत, 
२२. विचित्र, 
२३. लाकडाचा चुरा, 
२४. गगन, आकाश, 
२६. हिच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने येतात, 
२७. घोड्याचे तोंड असलेली देवता किंवा गाणे बजावणे करणारी एक जमात, 
२९. करवंटीवरचे तंतू 
                

संबंधित बातम्या