शब्दकोडे ११
शब्दकोडे ११
आडवे शब्द :
१. म्हणजे लाक्षणिक अर्थाने हवी त्याने हवी तितकी न्यावी अशी वस्तू,
५. साखळी जोडणारा भाग किंवा आशीर्वाद,
७. हुक्कापाणी बंद करणे, वाळीत टाकणे,
८. कुलक्षय, निर्वंश,
९. गाढव किंवा घासण्याचा कागद,
१०. क्रमिक पुस्तकातील पाठ किंवा शिकवण,
१३. जबरी चोरी, दरोडा,
१५. धूम्रपानाचे गुडगुडीसारखे साधन,
१६. पालन पोषण, सांभाळ,
१७. थंड किंवा आल्हाददायक वाटणारे परदुःख,
१९. त्रिदोषांपैकी एक, श्लेष्मा,
२०. ज्याला खरी परीक्षा नाही असा,
२४. प्रदक्षिणा, फेरी,
२६. गुर्मी, ताठा,
२८. कापडाचा एक अतिशय मुलायम प्रकार,
३०. दुर्दशा,
३१. आळूची मसालेदार पातळभाजी
उभे शब्द :
१. प्रसूत झालेल्या स्त्रीला आणि तिच्या अर्भकाला देण्याच्या भेटवस्तू,
२. शामळू, दम नसलेला,
३. रंगीत नक्षी असलेले कापड,
४. घराच्या पायात भरण्याचे कापड,
५. अवर्षणामुळे किंवा जास्त पावसामुळे उभे पीक नष्ट होणे,
६. आठवड्यातील दिवस किंवा तलवारीचा घाव,
९. दगडाचा हा लहान तुकडा टाकून खोलीचा अंदाज घेतात,
१०. हा आघात भाऊचा असेल तर मुंबईतील पूर्वीची कोकणात जाणाऱ्या बोटी लागण्याची जागा,
११. ज्याचे ज्ञान दृष्टीद्वारे होत नाही असे,
१२. पूर्वी संस्थानिकांना दिला जाणारा भत्ता,
१४. भोपळ्याची एक जात,
१५. एक धान्य, कुळीथ,
१८. अनिर्बंध, मुक्त,
१९. समुद्रातील एका प्राण्याचे कवच जे पूर्वी चलनात होते,
२१. कोळिष्टके,
२२. हा द्रवरूप धातू चढला की तीव्र संताप,
२३. पायस, दुधात शेवया वगैरे घालून केलेला पदार्थ,
२५. दोन हात करणे किंवा स्पर्धा,
२७. लहान मुलाचे टोपडे,
२९. धवल, शुभ्र