शब्दकोडे 12

किशोर देवधर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

शब्दकोडे 12

आडवे शब्द
१.     खडतर परिश्रमानंतर प्राप्त झालेले, 
४.     श्राद्धात सर्व पितरांना मिळून अर्पण करण्याचा एकच भाताचा गोळा किंवा रक्ताच्या नात्यात केलेला विवाह, 
६.    निषेध, निंदा, 
८.     गंजिफाच्या खेळात लागलेली पाने किंवा मान्यता, 
१०.     पूर्ण भरतीची वेळ किंवा संवत्सर, 
११.    या दोन संख्या वाजणे म्हणजे दाणादाण, पांगापांग, 
१२.     विशिष्ट शैली, अदा, 
१३.     आगीचा लोळा, 
१४.     आत्मा आणि ईश्वर यात भेद करणे, 
१५.     सोटा, दंडुका, 
१७.     पृथ्वीचा गोल, विश्व, 
१८.     सुताराचे लाकूड तासण्याचे एक हत्यार, 
२०.     गिळून चूप बसण्याचे द्विदलधान्य, 
२१.     फाशांच्या खेळातील एक दान, 
२५.     कषाय, उकळून काढलेला अर्क, 
२६.     हिंग, 
२८.     आईचा भाऊ, मामा, 
२९.     मवाली, उचल्या, 
३०.     निषिद्ध, त्याग केलेले, 
३१.     बाजू सावरून धरणारा 

उभे शब्द 

१.     पुरणाची करंजी, 
२.     टरफलासहित तांदूळ, 
३.     दह्यातील पाणी निथळून काढून केलेला पदार्थ, 
५.     म्हणजे स्वतःवरून जगाचे रूप ओळखावे, 
६.     मंदगती, हळू, 
७.    नियमित आहार, हा दुधाचा घालतात, 
९.     विविध पात्रात कमी जास्त पाणी घेऊन केलेले वाद्य, 
१०.     निमित्त, कारण, 
१३.     ऊस असा वाकडा असला तरी रस गोडच असतो, 
१६.     घराच्या पायात भरण्याचे दगड, 
१९.     कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज किंवा मशिदीतून केलेला पुकारा, 
२०.     ही देणे म्हणजे गाडणे, पुरणे, 
२१.     पेच, गुंता, 
२२.     खबरबात, समाचार, 
२३.     मोठा तंबू किंवा रांजण, 
२४.     या वाळवलेल्या आल्यावाचून खोकला गेला तर उत्तमच, 
२५.    शिंपल्यातील प्राणी, 
२७.    एक सुवासिक वनस्पती

संबंधित बातम्या