शब्दकोडे १३

किशोर देवधर
सोमवार, 11 जानेवारी 2021


शब्दकोडे १३

आडवे शब्द : 
१. शिरोभूषण, 
३. बेपर्वा, बेफिकीर, 
६. सोपा, पडवी, 
७. प्राणिमात्राविषयी सहानुभूती, 
९. काजळाचा एक प्रकार, 
११. मुसलमान, 
१२. हातावर देऊन पोबारा करण्याची डाळ, 
१४. नवीन कल्पना किंवा भांगेचा तुरा, 
१५. आत अग्नी असलेले फुटके मडके, हे तोंडाचे करणे म्हणजे शिवीगाळ, 
१६. सुंदर चेहऱ्याचे एक विशेषण, 
१७. फेफरे, अपस्मार नावाचा फीट येण्याचा विकार, 
१८. मेल्याशिवाय न जाणारी वाईट सवय किंवा गंध उगाळण्याचे चंदनाचे लाकूड, 
१९. फिरकी, गुंडाळी, 
२०. जाडसर कणीदार पीठ, 
२२. वणवा, 
२३. कमी खोलीचे, पसरट, 
२४. खूप खोल खड्डा, 
२५. कर्ज फेडण्यास असमर्थ, 
२७. कमळ, 
२८. फणसाची एक जात 

उभे शब्द : 
१. विस्मरणाचा दोष त्यासाठी माफी मागून मोकळे व्हावे, 
२. मनातील विचार, 
३. चण्याच्या डाळीचे पीठ, 
४. दोन डोंगरांमधील खोल जागा, 
५. ढगांचा समूह, 
८. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत, 
९. देव, 
१०. तीर्थयात्रेहून परतल्यावर दिलेले ब्राह्मण भोजन, 
१२. व्याजाच्या हिशेबाचा एक प्रकार, 
१३. बैलाच्या मानेवरील ओझे, जू, 
१५. असे प्रयत्न म्हणजे स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणण्यासारखे, 
१६. तोंडपाठ, 
१९. स्फूर्ती, गती देणे, 
२१. कसर, फर्निचर वगैरे कुरतडणारा कीटक, 
२३. कार्यशक्ती, काम संपवण्याचा झपाटा, 
२६. शिष्य किंवा सेवक 
                           ००००००

 

संबंधित बातम्या