शब्दकोडे १४

किशोर देवधर  
सोमवार, 18 जानेवारी 2021

शब्दकोडे १४

आडवे शब्द : 
१. मोगरा किंवा चंदन, 
४. इमारतीच्या दोन खांबांमधील जागा किंवा ओटीचे कापड, 
५. खड्ग, तलवार, 
७. शिक्षकी पेशा, 
८. गुदाम, माल साठवण्याची जागा, 
९. काकडीचे एक तोंडीलावणे, 
११. गगन, आकाश, 
१३. अत्तराचा बोळा, 
१४. मनगटाचे माप, 
१५. उत्कट इच्छा, 
१७. स्वसंरक्षक लोखंडी अंगरखा, 
१९. फुरसत, मोकळा वेळ, 
२०. गिरवण्याचा आदर्श, नमुना, 
२२. समज, ज्ञान, 
२३. उसाचे कांडे किंवा बोटाचा भाग किंवा एक फळ, 
२४. वंचना, फसवणूक, 
२७. यंत्राच्या सुट्या भागांना लावण्याचे जळालेले तेल, 
२८. प्रफुल्लित, ताजेतवाने, 
२९. अंथरुणाची गुंडाळी

उभे शब्द : 
१. एक पर्वत किंवा भुंगा, 
२. वैष्णव कपाळाला लावतात ती पिवळी माती, 
३. मिलाफ, आपसातील ताळमेळ, 
४. गाई म्हशीच्या चिकापासून तयार केलेला गोड पदार्थ, 
६. रोखठोक, स्पष्ट, 
९. देह, शरीर, 
१०. पूर्वीचे एक साधारणपणे अर्ध्या शेराइतके वजन, 
१२. शिफारस, 
१३. दान टाकण्याचा ठोकळा, 
१४. हाताचा अंगठा आणि करंगळी ताणून होणारे अंतर, 
१६. सर, माळ, 
१७. सर्वात वेगाने धावणारा प्राणी, 
१८. पूर्वीचे राजे पाठवायचे ते थैलीपत्र, 
१९. आरास, सुशोभित करणे, 
२०. अंत्यविधी करणारी ब्राह्मणांची पोटजात, 
२१. तेल काढण्याचे यंत्र, 
२४. ओंकार, 
२५. परीट, धोबी, 
२६. मूर्च्छा, भोवळ

संबंधित बातम्या