शब्दकोडे क्र. 16
शब्दकोडे क्र. 16
आडवे शब्द
१. वरच्या मजल्यावर नेणारा विजेवर चालणारा पाळणा, लिफ्ट,
४. मनातील पूर्वदूषित ग्रह,
६. पायऱ्या असलेली मोठी विहीर,
७. चरबी,
८. लसणाची पाकळी किंवा दह्याची कवडी,
९. सळई, गज,
१०. हिमटा, कंजूष,
११. कालवड, गोजी,
१२. पडवी, ओसरी,
१३. एक वाद्य किंवा याची पेटी म्हणजे हार्मोनियम,
१४. कुंभ, घडा,
१६. स्त्रियांचा मनगटात घालण्याचा एक दागिना किंवा एक हजार रुपये भरलेली पिशवी,
१७. बाहू, हात,
१८. आग रामेश्वरी लागली तर हा सोमेश्वरी जाऊन काय उपयोग?,
२०. अवनी, पृथ्वी,
२२. बंदुकीच्या पुढील भागाला लावलेले पाते,
२४. घोड्याच्या अंगावर पांघरण्याची जाळीदार झालर,
२७. समुद्राच्या लाटांचा आवाज,
२८. खाणीत सापडणारे,
३०. दबदबा, आदरयुक्त भीती,
३२. सावकार, कर्ज देणारा,
३४. मोठे अवजड शरीर,
३५. फांद्या असलेले भरपूर सावली देणाऱ्या झाडाचे विशेषण
उभे शब्द
१. उपदेशात्मक, सूचक,
२. याचा पाग्या झाला तरी येळकोट जात नाही,
३. मुघल साम्राज्यातील उमराव, सरदार,
४. वक्रदृष्टी, खपामर्जी,
५. घाम,
७. रोज पाल लावायचे आणि काढायचे असा बाजार,
९. जादूची काठी,
११. बंधन, फास,
१२. हा खाण्याचा पिण्याचा आणि धुण्याचादेखील असतो,
१५. कोल्हापुरी मिरचीची जात,
१६. घोड्याला दाणा चारण्याची पिशवी,
१९. डौल, उसने अवसान,
२१. भक्ष्य, शिकार,
२२. प्रश्नोत्तररूपी संभाषण,
२३. नौबत, डंका,
२५. अंबोळी, धिरडे,
२६. डोक्याच्या केसातील ऊचे पिल्लू,
२९. कंत्राट मिळवण्याचा अर्ज, टेंडर,
३१. निबर, खरखरीत,
३२. मुंडक्याशिवाय शरीर,
३३. उखाणा, कूटप्रश्न