शब्दकोडे क्र. १८
शब्दकोडे क्र. १८
उभे शब्द
१. मराठी व्याकरणातील एक वृत्त, मंगलाष्टकांची रचना या वृत्तात आहे,
२. एक पक्षीविशेष,
३. झणझणीत काजळ,
४. अगदी मुद्दाम, जाणीवपूर्वक,
५. सौभाग्यालंकार किंवा भिंतीवर चित्रे कोरलेली गुहा,
६. तेलाची वगैरे दाबता येण्यासारखी बाटली,
९. कढवलेले लोणी गाळून राहिलेला भाग,
१०. सहज फुंकून टाकता येईल अशा मालमत्तेचा प्रकार,
११. नामफलक किंवा मोठी टोपली,
१२. कर्जाची देणे राहिलेली रक्कम,
१४. किरीट, मुकुट,
१५. संस्थेची ठेव, शिल्लक,
१६. वरिष्ठ सरकारी अधिकारी किंवा पु.ल.देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेले रशियन नाटककार निकोलाय गोगोल यांचे ‘द इन्स्पेक्टर जनरल’ हे नाटक,
१८. घराच्या मध्यभागातील खोली,
२३. नासवलेल्या दुधापासून तयार केलेला पदार्थ,
२५. हर्ष, आनंद,
२६. व्यासपीठ
आडवे शब्द
१. घोड्यांचा वैद्य,
४. प्रगती अधोगती दाखवणारे रेखाचित्र,
६. पक्ष्यांना घाबरवण्यासाठी शेतात उभे केलेले बाहुले,
७. जरीचा मोठा पदर,
८. प्रणाम, नमस्कार,
११. आपल्या पोटात असलेला एक अवयव, प्लीहा,
१३. खेळण्याचे मैदान,
१४. तिरडी किंवा कामट्यांचा दरवाजा,
१५. उभट पातेले किंवा लोखंडावर येणारा तांबूस थर,
१६. हौदा, हत्तीवरील डोलारा,
१७. पर्वा, फिकीर,
१९. कचका, जोर किंवा कातडे घोटण्याचे हत्यार,
२०. काहींना आपले हे चर्मवाद्य सारखे वाजवण्याची सवय असते,
२१. एक धातू,
२२. उत्पन्न किंवा शिल्लक,
२४. झुंबड, गर्दी,
२५. एकत्र बांधलेली लाकडे, काटक्या,
२६. स्वर्गातील गंगा,
२७. सैन्याला दाण्यागोट्याची कुमक,
२८. खुंटी मजबूत करण्यासाठी ठोकलेली काटकी