शब्दकोडे क्र. 19
शब्दकोडे क्र. 19
आडवे शब्द
१. रामदासस्वामींचे मनाचे श्लोक मराठी व्याकरणातील या वृत्तात आहेत,
५. गुलाम किंवा न मोडलेला अखंड रुपया,
६. वर्दळ, गर्दी,
८. हारोळी, मोठी करंजी,
१०. रूपे, चांदी,
१२. कुचेष्टा, टिंगल,
१३. न पेलणारे, बेताबाहेरचे,
१५. पोपट किंवा दळलेली हळद,
१६. शेंडीभोवतालचे केसांचे वर्तुळ,
१७. हा वेदनेने स्नायूत येतो तर भीतीने पोटात,
१८. हत्तीच्या गंडस्थळातून स्रवणारा रस,
२०. वीज निर्माण करणारे यंत्र,
२२. जिचे अवयव सुंदर आहेत अशी,
२४. टेकण्याची मृदंगाच्या आकाराची उशी,
१६. तितिक्षा, माफी,
२८. पापडाच्या पिठाची गोळी,
२९. अविचाराने तोंडावर बोलणारा,
३०. तिन्हीसांजेची उजळणी,
३२. उदबत्तीचा चटका,
३३. विष, जहर,
३४. खेळातील जोडीदार
उभे शब्द
१. द्रवपदार्थ ओरपणे,
२. दाटून आलेला कंठ,
३. यज्ञ किंवा पूजा,
४. सोय, व्यवस्था,
५. झाडेझुडपे वाढलेली जमीन,
७. सप्ताहातील अपशकुनी दिवस,
९. नृत्यकलेचा देव,
११. वार्धक्य, म्हातारपण,
१३. पुसण्याचे फडके,
१४. शंकराचे चर्मवाद्य,
१७. घराण्याचे नाव,
१९. विश्वासघात,
२१. खास विश्वास, दृढ प्रेम किंवा भक्ती,
२२. पत्रास किंवा शरम,
२३. संत ज्ञानेश्वरांनी शोध लावलेल्या सापशिडी या खेळाचे त्यावेळचे संबोधन,
२४. तांब्या, तपेली,
२५. लहान मुलांचे औषध, लहानपणी झालेले संस्कार,
२७. ठोक, चोप,
२८. दीन, निरुपाय,
२९. कुऱ्हाड किंवा जमिनीवरील लादी,
३१. तमाशातील नाटक