शब्दकोडे क्र. 20

किशोर देवधर
सोमवार, 1 मार्च 2021

शब्दकोडे क्र. 20

आडवे शब्द

१.     अंतर्साल, झिरझिरीत कागद किंवा कापड, 
३.     दोनाचे चार हात होणे म्हणजे लग्न किंवा हातात बेड्या पडणे, 
६.     शुष्क पदार्थ खाल्याने घशास कोरड पडून गिळण्यास होणारा प्रतिबंध, 
७.     रोम किंवा रामाचा एक पुत्र, 
९.     फकिरी किंवा अस्वल वगैरे प्राण्याचे खेळ करणारा, 
१०.     सुटकेचा निःश्वास, 
११.     देवापुढे अखंड तेवणारा दिवा, 
१२.     सूर्याचे तिरपे किरण किंवा त्याची उष्णता, 
१३.     वसा, व्रत, 
१४.     वृत्तपत्रातील छोटा संपादकीय लेख, 
१६.     दहा अब्ज ही संख्या किंवा घोड्याचा एक रंग, 
१७.     पानथरी, लसीका संस्थेतील सर्वात मोठे इंद्रिय, 
१९.     सुवर्णकीटक, काही वेळेस हा दिवसाही डोळ्यापुढे चमकतो, 
२१.     कलेत रुची घेणारा, 
२३.     काकडीची मोठ्या आकाराची जात, 
२४.     पोटात पाणी होण्याचा विकार, 
२८.     अवजड वस्तू उचलण्याचे यंत्र, क्रेन, 
३१.     नेमका कोणता निर्णय घ्यावा याच्या संभ्रमात पडणे, 
३२.     अगदी जवळचे, दाट संबंध 

उभे शब्द 
१.     प्राणिमात्राविषयी सहानुभूती, 
२.    सोनाराच्या दुकानाबाहेर बसून माळा गुंफण्याचे काम करणारा, 
३.     स्वादिष्ट, रुचकर, 
४.     शिरोभूषण, मंजिरी, 
५.     संगीताची मैफल, 
८.     ओहोटी, 
१०.     नाटकातील भरतवाक्य, 
१२.     घृणा, किळस, 
१३.     मृदंग, 
१८.     बर्फाळ प्रदेशात आढळणारा केसाळ प्राणी, 
२०.     पावसाळी हवेचे एक विशेषण, 
२२.     दैवी देणगी, 
२३.     उदास, दुःखी, 
२५.     माळेतील मधला लोंबता मणी, 
२६.     किंमत, गुण किंवा योग्यता, 
२७.     विष्णूचा एक अवतार, कासव, 
२९.     झुंबड, गर्दी, 
३०.     या लाकडातही देव असतो

संबंधित बातम्या