शब्दकोडे क्र. 21

किशाेर देवधर
सोमवार, 8 मार्च 2021

शब्दकोडे क्र. 21

आडवे शब्द
१.     मोठ्या मनाचा, 
६.     पत्रिकेतील देव, राक्षस व मनुष्य हे प्रकार, 
७.     सोन्याच्या वळ्याला तारेने गोल वेढे देऊन केलेली अंगठी, 
८.     मूस, ठसा, 
१०.     हा कलश पापाचा असेल तर कधी ना कधी भरतोच, 
११.     कोबीची कोशिंबीर, 
१२.     कमान, धनुष्य, 
१३.     किल्ल्याभोवतालचा चर, 
१५.     कढवलेले लोणी गाळून राहिलेला भाग, 
१६.     पूजनीय, आदरणीय, 
१७.     मासे पकडणारा असो नाहीतर आठ पायांचा कीटक त्याचे उदरभरणाचे साधन, 
१८.     लहान मुलांचे इरल्याच्या आकाराचे टोपडे, 
१९.     भव्य, शानदार, 
२०.     इंद्रजाल किंवा सर्पदंशावरचा मंत्र, 
२२.     तमाशातील नाटक, 
२४.    लिहिण्याची पद्धत, 
२५.     अस्ताव्यस्त पडलेले सामान किंवा कामाचा व्याप, 
२६.     अल्प का होईना पण वाटा     उचलणारा प्राणी, खार, 
२७.     तेंदूच्या पानात तंबाखू घालून केलेली धूम्रनालिका, 
२८.     हिममानव, 
२९.     हे दोन प्राणी म्हणजे हडकुळ्या आणि खप्पड माणसाचे विशेषण

उभे शब्द 
१.     पाणी वर ओढण्याची क्रिया, 
२.     तंतू, 
३.     धिप्पाड, शक्तिशाली, 
४.     उणीव, कमतरता किंवा व्रत पूर्ण झाल्यावर देण्याचे दान, 
५.     घुसळखांबाची दोरी, 
७.     कारणाशिवाय मधे तोंड खुपसणारा, 
९.     चाकांच्या खुणा असलेला रस्ता, बहुतेक या मार्गानेच जाणे पसंत करतात, 
१०.     घोडी, शिडी, 
११.     पायाची लयबद्ध हालचाल, 
१४.     मोहोळ, मधमाशांचे घरटे, 
१५.     अनिर्बंध, मोकाट, 
१७.     वरपक्षाकडील पाहुण्यांच्या उतरण्याची खोली, 
१८.     मानवी शरीरात असलेली ही दिव्य शक्ती जागृत करावी लागते, 
२१.     बहुभाषी, वाचाळ, 
२३.     वेढा, विळखा, 
२५.     लागवडीखाली नसलेली जमीन, 
२६.     फिरकी, गुंडाळी, 
२७.     नुकसान झाल्यास भरपाई मिळण्याची व्यवस्था

संबंधित बातम्या