शब्दकोडे क्र. 22
शब्दकोडे क्र. 22
आडवे शब्द
१. केशर किंवा सुगंध,
३. रासायनिक मूलद्रव्याचा लहानात लहान कण, याची संकल्पना प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कणाद याची आहे,
६. पागोट्याभोवती गुंडाळण्याचे फडके,
७. एखाद्या कर्माचे वा व्रताचरणाचे फळ सांगणारा ग्रंथभाग,
८. पलंग विणण्याची सुती पट्टी,
९. फार मोठा फायदा,
११. समुद्राच्या भरतीचे पाणी जेथवर जाते तेथवरचा नदीचा भाग,
१२. मीठ वगैरे ठेवण्याचे चिनी मातीचे पात्र,
१४. मेंदी,
१५. नांगीचा दंश,
१६. निरर्थक गोष्ट किंवा आटलेली गाय, म्हैस,
१८. वचन, आश्वासन,
२०. नेकी, इमान,
२२. लग्नातील आतिथ्यविधी,
२३. काटकी तासून केलेली लेखणी,
२४. मनसुबा, योजना,
२५. पुंडाई, दांडगाई,
२७. अगदी पूर्णपणे पारंगत, अर्जुन धनुर्विद्येत होता तसा,
३०. लग्नाची बायको,
३१. तेजस्वी, पराक्रमी
उभे शब्द
१. रविवारी हस्तनक्षत्र आल्यावर केला जाणारा एक वसा,
२. मोठे स्वयंपाकघर,
३. पक्षकार, वकिलाचे गिऱ्हाईक,
४. सोपे, सहज होण्यासारखे,
५. वाट पाहाणे,
७. स्थानकावरील गाड्या थांबण्याची जागा,
१०. अफूतील बी किंवा ही हास्याचीही पिकते,
१३. झाडातून निघणारा द्राव किंवा कोवळे दूध,
१४. युक्ती किंवा चातुर्य,
१६. मांजरी किंवा नदीच्या पात्रातील उघडा पडलेला भाग,
१७. शंकराचे चर्मवाद्य,
१९. उजव्या खांद्यावर जानवे घेण्याची क्रिया,
२१. जिभेचे लाड,
२३. लसणाची पाकळी किंवा दह्याची कवडी,
२४. निःसंशय,
२५. बहिणीची मुलगी,
२६. बैलांतील म्होरक्या,
२७. शैक्षणिक वर्षाचा एक भाग,
२८. लक्ष्य, उद्दिष्ट,
२९. हा धरला तर संयम आणि दिला तर आधार