शब्दकोडे २४

किशोर देवधर
सोमवार, 29 मार्च 2021

शब्दकोडे २४

आडवे शब्द 

१. आवळा, 
४. लहान मुलांचे टोपडे, 
७. मसाला वाटण्याचे दगडी साधन किंवा वाटाण्याची उसळ, 
९. मासे पकडणारा कोळी किंवा पालखी वाहणारा, 
१०. हिरमोड, रसभंग, 
११. बेंबीत सुगंधी पदार्थ असलेले हरिण, 
१४. ओतीव लोखंड किंवा एक जिल्हा, 
१८. या कंदमुळातून साखर काढतात, 
१९. हातपाय जखडून टाकण्याची काठी, 
२१. बुधवार, 
२३. नौबत, नगारा, 
२४. रक्षा, भस्म, 
२५. हरणाची लहान आकाराची जात, 
२७. अल्प, मोजके, 
२९. अनेक रस्ते मिळण्याची जागा, 
३०. दोन बोटांचे माप, 
३१. हरणाची एक जात, 
३३. रेतीवरील रेषा किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या, 
३५. नीटनेटके, व्यवस्थित

उभे शब्द
१. प्रसूती व मुलांचे संगोपन याचा अभ्यास, 
२. श्रावणघेवडा, 
३. खांबावर आडवी टाकलेली तुळई, 
५. कोळसे करणारा, 
६. ज्यामुळे त्वचेवरचे केस झडतात असा एक विकार,
८. टपाल, पत्रे, 
९. जीवनातील दुःखे, 
१२. प्रशंसनीय, 
१३. कमळाचे देठ, 
१५. कागदपत्रावर सह्या करणारा राजाचा अधिकारी, 
१६. हा मोठा दगड कुणी सुखासुखी आपल्या पायावर पाडून घेत नाही, 
१७. मनोहर, सुंदर, 
१९. नुकतेच बाहेर पडलेले केळफूल किंवा कानफाट्याचे तंतूवाद्य, 
२०. ढोंगी, 
२१. आकाशात चमकणारी वीज, 
२२. सुंदर स्त्री, 
२३. नांगीचा दंश, 
२४. पौर्णिमा, 
२५. विद्रूप, भयंकर, 
२६. पूर्वीचे साधारणपणे अर्ध्या शेराइतके एक वजन, 
२८. मुलायम, मऊ, 
२९. एक त्वचारोग, हा काट्याचा होतो, 
३२. तिरडी किंवा कामट्यांचा दरवाजा, 
३४. साखर गाळल्यानंतर राहिलेला मद्यार्क तयार करण्याचा भाग

संबंधित बातम्या