शब्दकोडे २७

किशोर देवधर
सोमवार, 19 एप्रिल 2021

शब्दकोडे २७

आडवे शब्द : 
१.     भेटल्यावर स्तुतिसुमने वाहणे पण माघारी निंदा करणे, 
४.     संगीतातील दुसरा स्वर, 
६.     चिन्ह किंवा इशारा, 
७.     प्रांत, टापू, 
९.     भोपळ्याची एक जात, 
११.     उसने अवसान, डौल, 
१२.     जेवण झाल्यावर ताटात राहिलेले किंवा खाली सांडलेले अन्नाचे कण, 
१३.     चांगले ज्ञान असलेला, समजणारा, 
१४.     निवडुंगाच्या जातीतील एक बहुगुणी वनस्पती, 
१५.     लोणच्याचा मसाला, 
१७.     हौदा, हत्तीवरील डोलारा, 
१८.     रंगीबेरंगी फुले येणारी एक काटेरी वनस्पती, टणटणी, चंदनाची लागवड याबरोबर करतात, 
२०.     भावाची बायको, 
२१.     एक नक्षत्र, याला पाऊस पडला नाही तर ढगाकडे बघण्याची वेळ येते, 
२४.     दुर्मीळ, क्वचित आढळणारा, 
२५.     अर्जुनाचे एक नाव, 
२६.     असे अन्नाला महाग होतात, 
२७.    आत्मा आणि ईश्वर वेगवेगळे मानणे, 
२८.     काही वेळेस सूर्य चंद्राभोवती दिसणारे वलय

उभे शब्द : 
१.     हे घेणे म्हणजे खरडपट्टी, यथेच्छ शिव्या देणे, 
२.     भांडवल, गुंतवलेले पैसे, 
३.     सुताराचे लाकूड तासण्याचे एक हत्यार, 
४.     उपकार किंवा कर्ज, 
५.    शिफारस, 
६.     डोक्यात शिरणारे वेड, 
८.     एक ऋषी किंवा या पक्ष्याचे दर्शन शुभ मानतात, 
९.     नेमका, बिनचूक, 
१०.     तापाने तापणे, 
११.     ज्याचे हात गुडघ्याला पोहोचतात असा, 
१५.     गल्ली, अरुंद रस्ता, 
१६. शेतात प्रथमच आलेल्या पिकाचा दिलेला थोडा नमुना, 
१८.     कुंपणावर लावली जाणारी ही काटेरी वनस्पती पोर्तुगीजांनी भारतात आणली, यापासून दोरखंड तयार करतात, 
१९.     कागद मोजण्याचे एक परिमाण, 
२०.     सरस्वती, वाणी, 
२२.     उन्हाळ्यात अंगावर येणारे लालसर पुरळ, 
२३.     हृदयाचे ठोके
 

संबंधित बातम्या