शब्दकोडे - 28

किशोर देवधर
मंगळवार, 27 एप्रिल 2021

शब्दकोडे २८

आडवे शब्द : 
१.     त्र्यंबकेश्वरजवळील हनुमानाचे जन्मस्थान असलेला पर्वत, 
३.     उत्तराखंडच्या गढवाल भागातील गंगोत्रीजवळचा २० हजार ८३० फूट उंच पर्वत, 
५.     स्वच्छ, गुळगुळीत, 
६.     ताबा, नियंत्रण, 
८.     मल्लाला दिला जाणारा नियमित पौष्टिक आहार, 
१०.     लांब व अरुंद खड्डा, 
१२.     संकुचित वृत्तीचा, 
१४.     क्रौंच, सारस पक्षी, 
१६.     प्रतारणा, फसवणूक, 
१८.     बळाचा, निश्चयाचा, 
१९.     फणसातील फळ, 
२१.     आपल्या अधीन करून घेण्याची विद्या

उभे शब्द : 
१.     धृतराष्ट्राची आई, व्यासमुनींना घाबरून तिने डोळे मिटून घेतल्याने तिचा मुलगा दृष्टीहीन जन्माला आला, 
२.     सुईचे दोरा ओवण्याचे भोक, 
३.     अशौच, मृत्यूनंतरचे दिवस वार, 
४.     ऐक्य, मिलाफ, 
५.     आपल्या अपेक्षेप्रमाणे होणारच नाही असे गृहीत धरून चालण्याचा सिद्धांत, 
७.     बाटलीच्या तोंडात दाबून बसवण्याचे झाकण, 
९.     पृथ्वीभोवतालचे वायूचे वेष्टण किंवा रागरंग, 
११.     मांडणी किंवा निर्मिती, 
१३.     मृत, मेलेला, 
१५.     अशक्त, दुबळा, 
१७.     ओरखडा, 
२०.     डोक्याने केलेला जोराचा आघात

संबंधित बातम्या