शब्दकोडे २८

किशोर देवधर
सोमवार, 3 मे 2021

शब्दकोडे २८

आडवे शब्द : 
१.     एक इंडो आर्यन भाषा जी उत्तर भारतात प्राकृत या नावाने ओळखली जाते, 
४.     दुर्लक्ष, हेळसांड, 
६.     रेतीवरील रेषा किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या, 
८.     दाटीवाटी, गर्दी, 
१०.     चक्रवाक, क्रौंच पक्षी, 
१२.     पाणी भरण्याचे पात्र, घागर, 
१३.     पनवती, अपशकुन, 
१५.     खरेदी, 
१६.     रेडा, टोणगा, 
१७.     अंगावर घसरणाऱ्या मुलायम रेशमी वस्त्राचे विशेषण, 
१९.     आडमुठा, व्रात्य, याच्या माथी हाणू काठी असे संत तुकाराम म्हणतात, 
२०.     कुलक्षय, निर्वंश, 
२२.     सुंदर स्त्री, 
२४.     एक धान्य, हुलगा, 
२५.     बुरुज किंवा किनारा, 
२७.     बाजारातील इभ्रत, 
२८.     प्रतिबंध, मज्जाव, 
२९.     राजस्थानातील एक दुर्मीळ होत चाललेली पोपटाची जात, 
३१.     प्रफुल्लित, ताजेतवाने

उभे शब्द : 
१.     धर्मपत्नी, भार्या, 
२.     पाचवी ते शालांत परीक्षेपर्यंतची शाळा, 
३.     हा धरला तर संयम आणि दिला तर आधार, 
४.     बलरामाचे शस्त्र, नांगर, 
५.     निनाद, घोष किंवा घड्याळाची घंटी, 
७.     संन्याशाचे निवासस्थान, 
९.     अस्थिर, दोलायमान, 
१०.     आंबा किंवा फणसाची पोळी, 
११.     फणसाची एक जात, 
१३.     निर्मूलन, उच्चाटन, 
१४.     संदिग्ध, मोघम, 
१६.     संवेदनशील, दुसऱ्याचे दुःख पाहून लागलीच डोळ्यातून पाणी येणारा, 
१८.     शिव्याशाप, हे कुणाचे घेऊ नयेत, 
२१.     पडदा किंवा सोंगट्या मांडण्याचा तक्ता, 
२३.     शिकाऱ्याची उंच झाडावरील बैठक, 
२४.     अपायकारक, इजा पोहोचवणारा आहार, 
२६.     कोहळा किंवा पिंगट रंगाचा, 
२८.     उसने अवसान, डौल, 
२९.     भले, कल्याण, 
३०.     पहिलवान, कुस्तीगीर

संबंधित बातम्या