शब्दकोडे २९

किशोर देवधर
सोमवार, 10 मे 2021

शब्दकोडे २९

आडवे शब्द : 
१.     एका बाजूला डोके दुखण्याचा एक विकार, मायग्रेन, 
३.     पुढची बाजू रुंद आणि मागची अरुंद असा भूखंड, हा लाभत नाही असे म्हणतात, 
५.     सुगंधी धूर सोडणारा एक पदार्थ, 
७.     शिरजोर, 
९.     नगद व्यवहार करणारा कर्मचारी, 
१०.     भीषण, भयंकर, 
१२.     मुक्या मारावर लावण्याचा ओढा, 
१४.     नवीन कोऱ्या वस्तूचे किंवा भर तिन्हीसांजेचे एक विशेषण, 
१८.     घोड्यावर स्वार होताना पाय अडकवण्याचे कडे, 
१९.     हत्तीचे नक्षत्र, 
२१.    बैठक, सतरंजी, 
२२.     कौमार्याचा बहर किंवा ताप चढण्यापूर्वी अंगावर येणारे शहारे, 
२५.     रोम, त्वचेवरील केस किंवा रामाच्या एका मुलाचे नाव, 
२७.     मुसलमान - ऐतिहासिक संदर्भाने वापरला जाणारा शब्द, 
३०.     खाडीकाठी उगवणारी वनस्पती, 
३१.     राजापुढे काठी घेऊन चालणारा, 
३२.     प्राणरक्षणाचे वचन

उभे शब्द : 
१.     स्मशानातील मडके फोडण्याचा दगड, 
२.     मध्यस्थी, जी यशस्वी करण्यासाठी कृष्णाची ख्याती होती, 
३.     पसारा, कामाचा विस्तार, 
४.     सैन्याची मोहीम, चढाई, 
५.     मोठे अवजड शरीर, 
६.     बायकोचा भाऊ, मेहुणा, 
७.     गाठले, गुंठण, मंगळसूत्र, 
८.     झुंड, टोळी, 
११.     वेडे चाळे, लोक नावे ठेवतील असे वागणे, 
१३.     सुगंध, सुवास, 
१४.     मकबरा, थडगे, 
१५.     हेम, कांचन, 
१६.     युद्धातील समेट, 
१७.     मोठे कुटुंब असलेला, 
२०.     प्रशंसा, कौतुक, 
२३.     कायम बहरलेले एक औषधी फुलझाड, 
२४.     स्मृती, आठवण, 
२६.     गुदाम, माल ठेवण्याची जागा, 
२८.     पती किंवा प्रियकर, 
२९.     शैक्षणिक वर्षाचा एक भाग

संबंधित बातम्या