शब्दकोडे ३१

किशोर देवधर
सोमवार, 24 मे 2021

शब्दकोडे ३१

आडवे शब्द : 
१.     पांथस्थांची तहान शमवण्याची जागा, 
३.     करवंटी किंवा तांबड्या व काळ्या चौकटीतले लुगडे, 
५.     ओढा, मोरी, 
६.     छोटी टेकडी, उतरण, 
८.     देवाची स्तुती करणारी पद्यरचना, संत तुकारामांच्या किंवा सप्तशती या रचनांचा यात समावेश होतो, 
९.     मंदगती, हळू, 
१०.     गोट्यांच्या खेळातील एक संज्ञा, दोन गोट्यांचा एकमेकींना स्पर्श झाल्यास ही वापरतात, 
१२.     विदुषी, विद्वान महिला, 
१४.     मसाल्यात घालण्याचा एका पालेभाजीचा वाळवलेला चुरा, 
१७.     बाह्यकरणी, वर दिसणारे, 
१८.     गुरांना पाणी पाजण्याचे दगडी पात्र, 
२०.    ग्लानी, थकवा, 
२२.     भाल्यासारखे एक शस्त्र, 
२४.     अपेक्षाभंग, 
२५.     कृष्णाचे गोपींबरोबरचे नृत्य, 
२७.     तगादा, मागणीचा आग्रह, 
२९.     नस, धमनी, 
३०.     कषाय, उकळून काढलेला अर्क, 
३१.     राजवट

उभे शब्द : 
१.     अभिनेत्याला गाण्यासाठी उसना आवाज देणारा, 
२.     धार्मिक ग्रंथ, 
३.     नारळ किंवा बेलफळ पोखरून केलेले पात्र, 
४.     हा बांधणे म्हणजे प्रतिज्ञा, निर्धार, 
५.     दत्तगुरूंशी संबंध असलेला एक संप्रदाय, यांचे मूळ गुरू आदिनाथ म्हणजे शिव आहे, 
६.     हा देणे म्हणजे उचलबांगडी, 
७.     वळलेली दोरी, 
१०.     तमाशातील एक उपप्रकार, अतिशोयक्तीच्या गप्पा, 
११.     कढवलेले लोणी गाळून राहिलेला भाग, 
१३.     निखारा किंवा जळून राख झालेले तांदूळ, 
१५.     मंदावलेला, आळशी, 
१६.     गवंड्याचे एक हत्यार, नवला, 
१८.     चांगली दृष्टी असलेला, नीट पाहणारा, 
१९.     हाताचे सर्वात लहान बोट, करंगळी, 
२०.     पलिता, काठीला चिंधी गुंडाळून केलेली मोठी दिवटी, 
२१.     वेढा, विळखा, 
२२.     ब्याद, नसती पीडा, 
२३.     हत्तीच्या ओरडण्याचा आवाज, 
२६.     सहजतेने, सफाईदारपणे, 
२८.     दालन, विभाग, 
२९.    थंड किंवा यावरून भाताची परीक्षा करतात

संबंधित बातम्या